Tarun Bharat

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

वृत्त संस्था/ ऍरहस

भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाचे येथे सुरू असलेल्या थॉमस चषक सांघिक आंतर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. बलाढय़ डेन्मार्कने भारताचा 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत डेन्मार्ककडून भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकिरेड्डी यांनी पुरूष दुहेरीचा सामना जिंकला. इतर तीन सामन्यांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना पराभव पत्करावा लागला. 2010 नंतर पहिल्यांदाच भारतीय बॅडमिंटनपटूंनी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

पहिल्या एकेरी सामन्यात डेन्मार्कचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ऍक्सेल्सनने भारताच्या किदांबी श्रीकांतचा 21-12, 21-13 अशा गेम्स्मध्ये केवळ 38 मिनिटात पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरूष दुहेरीच्या सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीने डेन्मार्कच्या किम ऍस्ट्रप आणि अँडर्स रेसमुसेन यांचा 21-15, 17-21, 21-18 असा पराभव करत भारताला बरोबरी साधून दिली. हा दुहेरीचा सामना 72 मिनिटे चालला होता.

दुसऱया एकेरी सामन्यात डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित अँटोन्सनने भारताच्या बी. साई प्रणितचा 45 मिनिटांच्या कालावधीत 21-8, 21-15 असा पराभव करत डेन्मार्कला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. परतीच्या दुहेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या ख्रिस्तेन्सन-सोगार्डने भारताच्या एम.आर. अर्जुन आणि धृव कपिला यांच्यावर 21-16, 21-9 अशी मात करत भारताचे आव्हान 3-1 अशा फरकाने संपुष्टात आणले.

या स्पर्धेत प्राथमिक गटातील लढतीत भारताने हॉलंडचा तसेच तेहैती यांचा 5-0 अशा समान फरकाने पराभव केला. पण त्यानंतरच्या लढतीत बलाढय़ चीनने भारताचा 4-1 अशा फडशा पाडला. प्राथमिक गटातील सामन्यानंतर चीन या गटात पहिल्या स्थानावर तर भारत दुसऱया स्थानावर राहिले. या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. उबेर चषक महिलांच्या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत जपानने भारताचा 3-0 असा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Related Stories

अल्ट्रा रनिंग चॅम्पियनशिप लांबणीवर

Patil_p

भारतीय महिला संघाचा एकतर्फी विजय

Patil_p

पुरूष हॉकी – भारत-स्पेन आज लढत

Patil_p

जी. साथियानचा जॉर्गिक डार्कोला धक्का

Patil_p

पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Patil_p

आता कोरोनाबाधित खेळाडूलाही खेळण्याची मुभा

Amit Kulkarni