Tarun Bharat

थ्रीडी प्रिंटिंग हाउस केवळ 5 दिवसांमध्ये तयार

Advertisements

आयआयटी मद्रासची कामगिरी

पारपंरिक घरापेक्षा 30 टक्के कमी खर्च

नव्या तंत्रज्ञानाने वेळेची बचत अन् प्रदूषणातही घट

आयआयटी मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने केवळ 5 दिवसांमध्ये सिमेंट काँक्रीटचे घर तयार केले आहे. चेन्नई कॅम्पसमध्ये 600 चौरस फूट बिल्ट एरियात वेगळय़ा प्रकारचे एक मजली घर तयार करण्यासाठी पारंपरिक घराच्या निर्मितीच्या तुलनेत 30 टक्के कमी खर्च आला आहे.

कल्पना, डिझाइनपासून फिनिश्ड घर तयार करेपर्यंत प्रत्येक गोष्ट ‘मेड इन इंडिया’ आहे. गृहबांधी क्षेत्रात याला क्रांतिकारक तंत्रज्ञान मानले जात आहे. भविष्यात स्वस्त आणि मजबूत घर तयार करण्यासाठी ‘बिल्ड’ नव्हे तर ‘प्रिंट’ या शब्दाचा वापर होऊ शकतो.

या घराच्या उभारणीसाठी एका विशाल थ्रीडी प्रिंटरचा वापर करण्यात आला, हा प्रिंटर कॉम्प्युटराइज्ड थ्री डायमेंशनल डिझाइन फाइलला स्वीकार करून आउटपूट देतो. सामग्री म्हणून यात सिमेंट, क्राँकीटचा वापर झाला आहे.

हे तंत्रज्ञान आयआयटी मद्रासच्या मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे तीन माजी विद्यार्थी आदित्य व्ही.एस. (सीईओ), विद्याशंकर सी. (सीओओ) आणि परिवर्तन रेड्डी (सीटीओ) यांच्या टीवास्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स या स्टार्टअपने विकसित केले आहे.

त्यांनी घराच्या विविध हिस्स्यांना प्रथम कार्यशाळेत प्रिंट केले, त्यानंतर पेनच्या मदतीने चेन्नई कँपसमध्ये जोडले आहे. 600 चौरस फुटातील या घरात एक बेडरुप, हॉल, किचन आणि अन्य आवश्यक भाग आहेत. प्रिंटरने घर तयार करण्याच्या तंत्रज्ञानान रिकामी जागा मिळाली तर पायापासून प्रत्येक सुविधा असलेले एक हजार चौरस फुटांचे घर केवळ 2 ते अडीच आठवडय़ांमध्ये तयार होऊ शकते अशी माहिती विद्याशंकर यांनी दिली आहे. मोठय़ा प्रमाणावर एकसारखी घरे तयार केली जात असल्यास एक घर 5 दिवसांत निर्माण होऊ शकते.

भाडेतत्वावर मिळू शकते यंत्र

ज्याप्रकारे बोअरवेलची यंत्रणा भाडेतत्वावर घेतली जाते, त्याचप्रकारे घर निर्मितीचे यंत्र (थ्ा्राrडी प्रिंटर)ही प्राप्त केले जाऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये १५ ठिकाणी बॉम्बहल्ला; एका मुलीसह तीन लोक जखमी

Archana Banage

पंजाबमध्ये 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा 80 हजार पार

Tousif Mujawar

आजपासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागले

Patil_p

चारधाम यात्रेवरील स्थगिती हटली

Amit Kulkarni

सिक्कीम सीमेवर भारत-चीन सैनिकांमध्ये मारामारी

Patil_p
error: Content is protected !!