Tarun Bharat

दंड वसुल करणाऱया समाज प्रमुखांवर कारवाई करा

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

लमाणी बंजारा समाजामध्ये मुला-मुलीने पळून जावून लग्न केले तर समाजातील प्रमुख त्यांच्या कुटुंबीयांकडून 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारत आहेत. दंड दिला नाही तर त्या कुटुंबावर बहिष्कार घालत आहेत. तेव्हा अशा प्रकारे वेठीस धरणाऱया समाजातील प्रमुखांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवृत्त न्यायाधीश अशोक चव्हाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.

लमाणी बंजारा हा समाज बेळगावसह सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्मयांमध्ये मोठय़ा प्रमाणात आहे. या समाजामधील लग्नाच्या रुढी वेगवेगळय़ा आहेत. आपल्या समाजाप्रमाणेच लग्न झाले पाहिजे. अन्यथा, त्यांच्यावर बहिष्कार घालू, असा इशारा हे समाजप्रमुख देत आहेत. काही दिवसांपूर्वी यरगट्टी येथील कुटुंबाकडून 7 लाख रुपये दंड आकारला आहे. लोकशाहीप्रधान देशात अशा प्रकारे दंड आकारणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बंजारा समाज हा मागासलेला समाज आहे. त्यामध्ये अशा प्रकारे काही जणांना पिळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. प्रेम करणे काही चुकीचे नाही. मात्र, त्यांना दंड आकारणे योग्य नाही. तेव्हा संबंधितांना योग्य ती सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Related Stories

न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू!

Patil_p

पुढील आठवडय़ात केवळ 3 दिवस बँका राहणार सुरू

Patil_p

खानापूर तालुक्यात आज आणखी चार कोरोना बाधित रूग्णांची नोंद

Tousif Mujawar

उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

जात-उत्पन्न दाखल्याच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे वृक्षारोपण

Amit Kulkarni
error: Content is protected !!