Tarun Bharat

दक्षता हॉस्पिटलमध्ये हृदय दिनाचे आचरण

प्रतिनिधी/ बेळगाव

टिळकवाडी येथील दक्षता हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पुजार यांनी हृदय दिनाची पूर्व पिठिका सांगितली.

ते म्हणाले, यंदाच्या हृदय दिनाची संकल्पना ही यूज यूवर हार्ट टू बीट यूवर हार्ट अशी आहे. कोणतेही काम ‘दिल से’ करायला हवे. अलिकडे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधिनता आणि ताण हे याचे कारण आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी ‘दिल से’ काम केले पाहिजे.

 हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर धाकोजी यांनी केक कापून सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. कट्टीमनी आणि हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.

Related Stories

रोज किमान 200 लस उपलब्ध करा

Omkar B

सीबीटी बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

आठवडय़ाभरात 6 हजार जणांवर दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

स्थलांतरित भाजीमार्केटमध्ये खरेदी-विक्रीला प्रारंभ

Amit Kulkarni

टिळकवाडी रेशन गोदामाजवळील गटारी बुजल्या

Amit Kulkarni

विमान प्रवाशांना मिळणार बस सुविधा

Patil_p