Tarun Bharat

दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कप संघात तीन स्पिनर्स

Advertisements

जोहान्सबर्ग : पुढील महिन्यात ओमान आणि संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची गुरूवारी घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली असून सलामीचा फलंदाज जानेमन मलानला वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व बवुमाकडे सोपविण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार सध्या दुखापतीमुळे पूर्ण तंदुरूस्त नसला तरी तो ओमानमधील स्पर्धेपर्यंत बरा होईल, असे सुचित करण्यात आले आहे. बवुमा या स्पर्धेत डी कॉकसमवेत सलामीला फलंदाजीस येईल. मार्करमला तिसऱया स्थानावर फलंदाजीसाठी पाठविले जाईल. मात्र मलानला वगळून अनपेक्षित धक्का दिला आहे. मलानने आपल्या पहिल्या दहा वनडे सामन्यात फलंदाजीत सातत्य राखताना 92 धावांची सरासरी नोंदविली होती. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी केशव महाराज, बियॉर्न फॉर्च्युन आणि शम्सी या तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून दक्षिण आफ्रिकेच्या गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, विद्यमान विजेता विंडीज तसेच पात्र फेरीतील दोन संघांचा समावेश राहील. दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर 23 ऑक्टोबरला अबु धाबीत होणार आहे.

दक्षिण आफ्रिका संघ -बवुमा (कर्णधार), केशव महाराज, डी कॉक, फॉर्च्युन, हेंड्रिक्स, क्लासेन, मार्करम, मिलर, मुल्डर, एन्गिडी, नॉर्त्जे, प्रेटोरियस, रबाडा, शम्सी, व्हान डर डय़ुसेन, राखीव- फेहलुक्वायो, जॉर्ज लिन्डे आणि लिझाद विल्यम्स.

Related Stories

इंग्लंड-द. आफ्रिका चौथी कसोटी उद्यापासून

Patil_p

पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

बेंगळूर एफसी संघाची घोषणा

Patil_p

बंगाल, मुंबईसह 7 संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पंजाबसाठी आजचा सामना ‘जिंकू किंवा मरू’

Patil_p

म्युनिच टेनिस स्पर्धेत बॅसिलाश्वेली विजेता

Patil_p
error: Content is protected !!