Tarun Bharat

दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर सात गडय़ांनी विजय

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

रविवारी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव करत या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 194 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 37.2 षटकांत 3 बाद 195 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.

बांगलादेशच्या डावामध्ये अतिफ हुसेनने एकाकी लढत देत 107 चेंडूत 9 चौकारांसह 72 तर मेहदी हसन मिराजने 49 चेंडूत 2 षटकार आणि एक चौकारांसह 38 जमविल्या. या जोडीने सात गडय़ासाठी 86 धावांची भागिदारी केल्याने बांगलादेशला 194 धावापर्यंत मजल मारता आली. लिटॉन दासने 3 चौकारांसह 15, रहीमने 11, मेहमुदुल्लाने 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशची एकवेळ 6 बाद 94 अशी केविलवाणी स्थिती झाली होती. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेचा रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 39 धावांत 5 गडी बाद केले असून एन्गिडी, पार्नेल, शम्सी आणि व्हॅन डेर डय़ुसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात मलानने 40 चेंडूत 4 चौकारांसह 26, डिकॉकने 41 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 62 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 12.3 षटकांत 86 धावांची भागिदारी केली. व्हेरेन आणि कर्णधार बवुमा यांनी तिसऱया गडय़ासाठी 82 धावांची भर घातली. व्हेरेनने 77 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 58, बवुमाने 52 चेंडूत 1 षटकार आणि तीन चौकारांसह 37 तसेच व्हॅन डेर डय़ुसेनने 14 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 8 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 5 षटकार आणि 21 चौकार नोंदविण्यात आले. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन आणि अतिफ हुसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिका संघाने आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग गुणतक्त्यात 10 गुण मिळविले असून आता हा संघ पुढीलवर्षी भारतात होणाऱया आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यासाठी टॉप आठ संघांत स्थान मिळविण्यासाठी धडपड करीत आहे.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश 50 षटकांत- 9 बाद 194 (अतिफ हुसेन 72, मेहदी हसन मिराज 38, मेहमुदुल्ला 25, दास 15, रहीम 11, रेबाडा 5-39, एन्गिडी, पार्नेल, शम्सी, व्हॅन डेर डय़ुसेन प्रत्येकी एक बळी), दक्षिण आफ्रिका 37.2 षटकांत 3 बाद 195 (डिकॉक 62, मलान 26, व्हेरेन नाबाद 58, बवुमा 37, व्हॅन डेर डय़ुसेन नाबाद 8, मेहदी हसन मिराज, अतिफ हुसेन आणि शकीब अल हसन प्रत्येक एक बळी).

Related Stories

केकेआर ‘शेर’, मुंबई इंडियन्स ‘सव्वाशेर’!

Patil_p

आयसीसीच्या मासिक सर्वोत्तम पुरस्कारासाठी बुमराहची शिफारस

Patil_p

इंग्लंडकडून 112 वर्षांचा जुना विक्रम मोडीत

Amit Kulkarni

जपानला नमवून चीन अंतिम फेरीत

Patil_p

तिरंदाज सचिन गुप्ताला तीन सुवर्णपदके

Patil_p

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा, फिरकीपटू अमित मिश्रा कोरोनाबाधित

Patil_p