Tarun Bharat

दक्षिण आफ्रिकेचा विंडीजवर मालिका विजय

वृत्तसंस्था/ ग्रेनाडा

डावखुरा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीची शानदार कामगिरी तसेच ‘सामनावीर’ मार्करम आणि डि कॉक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने शनिवारी शेवटच्या सामन्यात यजमान विंडीजचा 25 धावांनी पराभव करून पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली.

शनिवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकांत 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना सामना गमवावा लागला.

दक्षिण आफ्रिकेच्या डावात मार्करमने 48 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह  70, डि कॉकने 42 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 60, मिलरने 16 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 18, मुल्डरने 1 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 6 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. डि कॉक आणि मार्करम यांनी दुसऱया गडय़ासाठी 128 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या एडवर्ड्सने 19 धावांत 2 तर डी ब्रॅव्हो आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या लुईसने 34 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 52, गेलने 9 चेंडूत 1 षटकारांसह 11, हेटमेयरने 31 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 33, कर्णधार पोलार्डने 15 चेंडूत 1 षटकारांसह 13, पुरणने 14 चेंडूत 2 षटकारांसह 20 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 9 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे एन्गिडीने 32 धावांत 3, रबाडाने 24 धावांत 2, मुल्डरने 31 धावांत 2, लिन्डेने 33 धावांत 1 गडी बाद केला. शम्सीने आपल्या चार षटकांत 11 धावांच्या मोदबल्यात एक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 4 बाद 168 (मार्करम 70, डि कॉक 60, मिलर नाबाद 18, मुल्डर नाबाद 9, एडवर्डस् 2-19, डी.ब्रॅव्हो 1-28, मॅकॉय 1-31), विंडीज 20 षटकांत 9 बाद 143 (लुईस 52, गेल 11, हेतमेयर 33, पोलार्ड 13, पुरन 20, एन्गिडी 3-32, रबाडा 2-24, मुल्डर 2-31, लिन्डे 1-33, शम्सी 1-11).

Related Stories

आयपीएलचा कालावधी कमी होईल : गांगुली यांचे संकेत

tarunbharat

इंग्लंडच्या रूटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सचे अग्रस्थान राखण्यावर लक्ष

Patil_p

आयर्लंड संघाच्या उपकर्णधारपदी पॉल स्टर्लिंग

Patil_p

आरसीबीने जिंकला ‘लो स्कोअरिंग थ्रिलर’!

Patil_p

रवि दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची ‘नहरी’ला प्रतीक्षा!

Patil_p