Tarun Bharat

दक्षिण कोरियाचे ‘ट्रिपल टी’चे सूत्र

Advertisements

कोरोना विषाणूचा फैलाव चीनच्या वुहान शहरातून सुरू झाला होता. या विषाणूने प्रारंभी चीन तसेच दक्षिण कोरियात फैलाव केला होता. पण दक्षिण कोरियाने या संसर्गावर बऱयाचअंशी नियंत्रण मिळविले आहे.

दक्षिण कोरियात 9661 जणांना लागण झाली आहे. मागील 24 तासांत तेथे 78 नवे रुग्ण सापडले आहेत. परंतु प्रारंभी ज्या वेगाने याचा संसर्ग वाढला होता ते पाहता दक्षिण कोरियाने अत्यंत सतर्कता दाखवून त्यावर नियंत्रण मिळविल्याचे म्हणावे लागेल.

दक्षिण कोरियाने वाढते रुग्ण पाहून ट्रिपल टी सूत्रानुसार पावले उचलली. सर्वप्रथम रुग्णाची ओळख पटविणे आणि त्यांनतर उपचाराचे सूत्र अवलंबिण्यात आले. ‘ट्रेस-टेस्ट-ट्रीट’ या सूत्रानुसार तेथे उपाययोजना राबविण्यात आली आहे. दक्षिण कोरियात 20 जानेवारी रोजी पहिला रुग्ण सापडला होता. वुहानमधून परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यानंतर देशात वेगाने रुग्ण वाढले होते. शिंकॉन्जी चर्चच्या माध्यमातून विषाणूचा फैलाव झाला होता.

रुग्ण महिलेने चर्चच्या प्रार्थनासभेत भाग घेतला होता. हा प्रकार समोर येताच प्रशासनाने सर्वप्रथम चर्चच्या सर्व 2 लाख सदस्यांची यादी प्राप्त केली. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच या सर्वांना विलग करण्यात आले आहे. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विलगीकरण प्रक्रियेचे कठोर पालन सुनिश्चित केले.

दक्षिण कोरियात विलगीकरणासाठी नवे नियम तयार करण्यात आले आणि उल्लंघनाच्या स्थितीत दंडाची रक्कम 7 लाख करण्यात आली. तसेच एक वर्षाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली. ट्रिपल टीच्या सूत्रामुळे दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या वेगाने वाढण्यापासून रोखण्यास मदत झाली आहे.

हेच सूत्र इटलीच्या ‘वो’ शहरात अवलंबिण्यात आले आणि तेथेही ते उपयुक्त ठरले आहे. कोरोना रोखण्यासाठी तेथे 97 टक्के लोकांची चाचणी करण्यात आली आणि रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले आहेत.

Related Stories

ब्रिटनमध्ये कृष्णवर्णीय कलाकारांसोबत भेदभाव

Patil_p

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी, १६ आमदार ठरणार अपात्र?

Abhijeet Shinde

महागाईविरोधात उद्या बिंदू चौकात महाधरणे आंदोलन

Abhijeet Shinde

नीट पीजी परीक्षा २०२२ पुढे ढकलण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Abhijeet Shinde

प्रभाग रचनेचा सस्पेन्स संपणार…

Sumit Tambekar

कमी होणारे रुग्ण अन् रिकव्हरी रेटमध्ये वृद्धी

Omkar B
error: Content is protected !!