Tarun Bharat

दख्खनचा राजा जोतिबा मालिका केदार विजय प्रमाणेच

शर्मिलाताई ठाकरे यांच्या शिष्टाईला यश, भाविकांत समाधान


वारणानगर / प्रतिनिधी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई ठाकरे यांच्या यशस्वी शिष्टाईने वादग्रस्त ठरलेल्या ” दख्खनचा राजा श्री जोतिबा ” या मालिकेतील पौराणिक व चुकीच्या संदर्भाने प्रसारीत होणाऱ्या भागामुळे पुजारी, भाविक याचा व मालिकेचे निर्माते यांच्यात सुरू असलेल्या वादावर मनसेने यशस्वी पडदा टाकत ही मालिका केदार विजय ग्रंथाच्या अधारे चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.

दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांसह भाविकांनी, आक्षेप नोंदवला होता. सदर मालिका हि पौरानिक व केदार विजय ग्रंथानुसार असावी अशी मागणी सुरुवातीपासूनच सुरू होती. कोठारे प्रोडक्शन निर्मित मालिकेमधून श्री जोतिबा देवाचे चुकीचे महात्म्य दाखवले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत लाक्षणिक भूमिका बजावत दिनांक १५ नोव्हेंबर रोजी खळ खट्याक आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची धास्ती घेऊन महेश कोठारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांची भेट घेऊन बैठक करण्याची विनंती केली होती. यानुसार ही बैठक पार पडली.

महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी, तसेच दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या महात्म्याचे इतिहास अभ्यासक सुनिल आमाने, रोहीत संभाजी मिटके दख्खन केदार एंटरटेन्टमेंट तसेच गुरव समाज अध्यक्ष ज्योतिबा डोंगरचे उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी कृष्णकुंज येथे शर्मिलाताई ठाकरे व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सकारात्मक चर्चा केली. सदर चर्चेमध्ये जोतिबा देवाचा इतिहास कसा चुकीचा अस दर्शवून दिले, मालिकेमध्ये या अशा चुकीच्या दृश्यामुळे देवाच्या महात्म्याची विटंबना झाली. हे दर्शवून दिले असे अनेक मुद्दे लक्षात घेऊन कोठारे प्रोडक्शनचे दिग्दर्शक महेश कोठारे यांना याबाबतच्या सर्व निदर्शनास आणून दिल्या व सदर मालिका थांबवावी तसेच मालिकाही पौराणिक स्तरावर केदार विजय ग्रंथ त्यानुसारच व्हावी अशी आग्रही भूमिका मांडत तसेच ही मालिका पौराणिक स्तरावर करण्यासाठी दख्खन केदार एंटरटेनमेंट यांना सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन देखील दिले.

याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे, पन्हाळा तालुका सचिव लखन लादे, उपाध्यक्ष नयन गायकवाड़, कोडोली शहर अध्यक्ष तुषार पोवार, जोतिबा शाखाध्यक्ष रोहीत मिटके, कोल्हापुर शहर विभागीय अध्यक्ष राहुल भाट,शाखाध्यक्ष संदिप चौगले़ तसेच दख्खन केदार एंटरटेन्टमेंटचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

जांभळी येथे राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित पुरुष कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

Archana Banage

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी समरजीत घाटगे

Patil_p

Kolhapur : गवशी-बळपवाडी बंधारा फुटी प्रकरणी कार्यकारी अभियंत्याला निलंबीत करा

Abhijeet Khandekar

उगार पद्मावती देवीच्या सोन्याच्या मूर्तीचे उद्या कुंभोजमध्ये आगमन

Archana Banage

कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीत आज आणखी एक खून

Archana Banage