Tarun Bharat

दगडात रोवलेली 700 वर्षे जुनी तलवार

Advertisements

पुरातत्वतज्ञांनाही आश्चर्याचा धक्का

किंग आर्थर खरोखरच होते की नाही? वर्षाच्या प्रारंभी मिळालेल्या काही दस्तऐवजांनी इतिहासात त्यांच्या अस्तित्वाबद्दल नव्याने दावे केले होते. पण दस्तऐवजांपेक्षा ठोस पुरावा आता बोस्नियाई नदीत मिळाला आहे. नदीतील एका दगडात रोवण्यात आलेली एक तलवार शोधली गेली असून तिला ‘शाही एक्सेलिबुर’ मानण्यात येते, जी किंग आर्थरची तलवार होती. पुरातत्वतज्ञांना दगडात चौथ्या शतकातील ही तलवार बोस्निया आणि हर्जेगाविनायच पश्चिमेस असलेल्या व्रबास नदीत मिळाली आहे.

किंग आर्थरवरून अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांनी जिनेवासोबत विवाह केला, नाइट्स ऑफ द राउंड टेबलचे दिग्दर्शन केले, एक्सेलिबुर तलवार स्वतःजवळ ठेवली आणि फितुर मोर्ड्रेडसोबत स्वतःच्या अंतिम लढाईनंतर त्यांना एवलॉनमध्ये दफन करण्यात आल्याची दंतकथा आहे. पण राजा आर्थर खरोखरच अस्तित्वात होते का केवळ सेल्टिक कथांचे नायक ही चर्चा शतकांपासून सुरू आहे.

पण चालू वर्षी राजा आर्थरबद्दल अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इतिहासकारांना ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठात मर्लिन, किंग आर्थर आणि होली ग्रेलविषयी हस्तलिखित आणि पांडुलिपीतील सात तुकडे मिळाले आहेत. हे तुकडे मूळ स्वरुपात फ्रान्सच्या स्ट्रासबर्गमध्ये 1494 आणि 1502 दरम्यान प्रकाशित झाले होते. या आश्चर्यजनक शोधामुळे किंग आर्थरच्या अस्तित्वाच्या दाव्यांना बळ मिळाले आहे. व्रबास बोस्नियातील 240 किलोमीटर लांबीची नदी आहे. शोधण्यात आलेली तलवार किंग आर्थरची असल्याचे मानले जातेय. पुरातत्वतज्ञ इवाना पांडजिक यांच्यानुसार 700 वर्षे जुनी तलवार नदीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 मीटर खोल एका दगडात रोवलेली सापडली आहे. ती अत्यंत खबरदारीपूर्वक बाहेर काढण्यात आली आहे.

Related Stories

बायडेनचा पहिला वार सौदी अरेबियावर

Amit Kulkarni

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 20.65 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

बैरुतमध्ये पुन्हा आगीचा भडका

Patil_p

रशियाचे राष्ट्रपती पुतीन इराणच्या दौऱयावर

Patil_p

मृत्यू टाळायचा असेल तर परत जा – युक्रेन राष्ट्राध्यक्ष

Abhijeet Khandekar

तालिबानचे पुनरागमन पाकिस्तानमुळेच

Patil_p
error: Content is protected !!