Tarun Bharat

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मुख्य मंदिरामध्ये गणेश कुंडामध्ये विसर्जन

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 128 व्या वर्षी उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण यांसह पोलीस दलातील अधिकारी देखील उपस्थित होते. प्रख्यात सनई वादक प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड यांनी गणरायाचरणी वादनसेवा अर्पण केली. तर, प्रभात बँडच्या मोजक्या वादकांनी सादरीकरण केले. 

मंगळवारी सायंकाळी 5 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने अनुभविला. लेकरांनो तुमच्या वरचं संकट घेऊन चाललोय… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिरात काढण्यात आली. गणेशाने कोरोनारुपी राक्षसाचा वध केल्याचे दृश्य रंगावलीत साकारण्यात आले. 

अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील बहुतांश गणेश मंडळांनी केले. तसेच अनेक पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन केले. त्याबद्दल ट्रस्ट सर्वांचे आभारी आहे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत झाली आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागला आहे. यावर्षी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या काळात मंदिरामध्ये गेले नाहीत. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुमारे दीड कोटी भाविकांनी दर्शन घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

Rohan_P

जगभ्रमंती करणारा सर्वात तरुण वैमानिक

Amit Kulkarni

लोखंडी फुफ्फुसांमध्ये अलेक्झेंडरचे जग

Amit Kulkarni

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Abhijeet Shinde

सौर अन्नावर पोसलेले गाव…

Patil_p

माणसाचे मांस आणि मलही खाणारे अघोरी…

Patil_p
error: Content is protected !!