प्रतिनिधी / शिरोळ
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कोविड सेंटर स्थापन केल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वरदान ठरत अनेक लोक उपचार घेत असून, रुग्णांना दिलासा मिळत आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे गेल्या 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कोविड सेंटर स्थापन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शंभर बेडचे नियोजन केले आहे. त्यापैकी 25 बेड सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात आले असून पंचवीस बेड अलगीकरण करिता स्थापन करण्यात आले आहे.
शिरोळ व हातकणंगले तालुक्यात खाजगी व सहकारी साखर कारखाने असून या सर्व सहकारी साखर कारखान्यांनी कोविड सेंटरची स्थापना केल्यास अन्य हॉस्पिटलवर पडणारा ताण कमी होणार आहे. व रुग्णांना वेळीच उपचार मिळणारी आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सेंटर स्थापन करणारा पहिला दत्त कारखाना ठरला आहे या कोविड सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांना याचा लाभ होत आहे या कोविड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांच्याबरोबर अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वच्छता टापटीप याची दक्षता कारखान्याच्या व्यवस्थापक मंडळींनी घेतली आहे .


previous post
next post