Tarun Bharat

दमणमध्ये आता कोरोनाचा शिरकाव

ऑनलाईन टीम / दमण : 


संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. येथील जवळपास सर्वच क्षेत्रे या महामारीच्या विळख्यात अडकली आहेत. मात्र, आता पर्यंत सुरक्षित असलेले दादरा नगर हवेलीतील दमण जिल्ह्यात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दमण जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. केंद्र शासित प्रदेशाचा हा जिल्हा आत्तापर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. पण आता या जिल्ह्यात देखील कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. 


दमण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राकेश मिन्हास यांनी सांगितले की, आज दमणमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील एक जण 41 वर्षाची व्यक्ती आहे. तर दुसरी चार वर्षाची मुलगी आहे. या दोघांनाही मारवाड मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेजण नुकतेच मुंबईतून इकडे आले होते. 


पुढे ते म्हणाले, आम्ही मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खारवाडी क्षेत्राला कन्टोनमेंट म्हणून घोषित केले आहे. आम्ही या क्षेत्रात सॅनिटाईझेशन सुरू केले आहे. तसेच या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध देखील घेतला जात आहे. 


दरम्यान, दादरा नगर हवेलीमध्ये यापूर्वी 22 कोरोना रुग्ण आढळून आले होते. मात्र, दीव आणि दमणमध्ये आता पर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. 

Related Stories

मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांचा घातकी हल्ला; 3 जवानांना वीरमरण

Tousif Mujawar

सांगली मनपा क्षेत्रातील ३० विहिरींची स्वच्छता

Abhijeet Khandekar

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

datta jadhav

विमानतळ उडविण्याची ‘अल कायदा’ची धमकी

Patil_p

१७ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने केले जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत

Rahul Gadkar

कोरोना : महाराष्ट्रातील बाधितांनी ओलांडला 60 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar