Tarun Bharat

दमदार पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ

वार्ताहर/ तुडये

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशय परिसरात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने पाणीपातळी 2461.50 फुटांवर पोहोचली आहे.

मंगळवारी सकाळी पाणीपातळी 2460.80 फूट इतकी होती. दिवसभरात पाऊण फुटाने पाणीपातळी वाढली आहे. मागील वर्षी 7 जुलैपर्यंत 601.3 मि.मी. पाऊस व 2458.30 फूट पाणीपातळी होती. यावेळी पाऊसही जादा झाला आहे. मंगळवारी सकाळी तो 781.6 मि.मी. इतका नोंद झाला आहे. यावर्षी पावसाने साथ दिल्याने तसेच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे पाण्याची मागणी कमी झाल्याने जलाशयातील पाणीपातळी स्थिर राहिली आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 16 फूट पाण्याची आवश्यकता आहे. तुडये येथील शेतकऱयांनी वाढीव पाणी पातळीस विरोध दाखविल्याने प्रशासनाला 2475 फुटांपर्यंत पाणी साठवावे लागणार आहे. तसे झाल्यास अजून 13.5 फूट पाणी जलाशय तुडुंब होण्यास पुरेसे आहे.  

Related Stories

परप्रांतीय कामगारांची ‘घरवापसी’

Patil_p

कोरोनातही गणरायाचे थाटात आगमन

Patil_p

बसपास प्रक्रियेतून 2 कोटींचा महसूल

Amit Kulkarni

शहर परिसरात गणेश जयंती भक्तिभावाने साजरी

Amit Kulkarni

महामोर्चासाठी शिवसेनेची बसुर्ते-मजगाव येथे जागृती

Amit Kulkarni

ग्रीनझोनमुळे सोयीपेक्षा गैरसोयीच अधिक!

Amit Kulkarni