Tarun Bharat

दम पनीर

Advertisements

साहित्य : 2 चमचे तेल, 1 कांदा चिरून, 4 लवंग, 4 वेलची, 1 दालचिनी तुकडा, 1 चमचा आलं खिसून, 1 चमचा लसूण पाकळय़ा चिरून, 1 हिरवी मिरची चिरून, 2 चमचे दही, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, मीठ, पाव चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काळीमिरीपूड, 20 पनीरचे चौकोनी तुकडे, 2 चमचे क्रीम, पाव चमचा काळीमिरी क्रश करून, 2 चमचे पुदिना पाने, 1 चमचा कोथिंबीर

कृती : गरम तेलात कांदा गुलाबी रंगावर परतवावा. गार झाला की मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. त्याच गरम तेलात लवंग, वेलची, दालचिनी आणि कांदा पेस्ट परतवावी. नंतर त्यात आलं-लसूण आणि हिरवी मिरची टाकावी. आता त्यात दही, धणेजिरेपूड, हळद पावडर, लाल तिखट पावडर, मीठ आणि गरम मसाला पावडर टाकून मिक्स करावे. नंतर त्यात काळीमिरीपूड टाकावी. नंतर पनीरचे तुकडे मिक्स करावेत. वरून क्रीम घालावी. ग्रेव्ही हवी असल्यास पाणी मिक्स करावे. वरून क्रश केलेली काळीमिरी टाकून मिश्रण वाफेवर शिजवावे. वरून कोथिंबीर आणि पुदिना टाकावी. तयार दम पनीर चपाती अथवा नानसोबत खाण्यास द्या.

Related Stories

काजू ग्रेव्ही

tarunbharat

चटपटीत पालक चना सूप

Amit Kulkarni

गार्लिक रस्सम

Omkar B

जगातील पहिला गोल्ड प्लेटेड वडापाव

Amit Kulkarni

टेस्टी समोसा सँडविच

Amit Kulkarni

नवरात्रीच्या उपवासासाठी ट्राय करा उपवासाचे घावणे

Kalyani Amanagi
error: Content is protected !!