Tarun Bharat

दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपीला अटक करण्यात वडुजच्या पथकास यश

प्रतिनिधी/   म्हसवड

 म्हसवड व परिसरात विविध ठिकाणी 2019 मध्ये घडलेल्या दरोडय़ाच्या गुह्यातील प्रमुख आरोपी असलेला भाऊसो अंतु चव्हाण  राहणार वाकी ( वरकुटे) तालुका माण यास गोपनिय खबर्याच्या मदतीने सापळा रचुन काल सोमवारी रोजी मा.पोलीस अधीक्षक सो सातारा तसेच मा.अप्पर पोलीस अधीक्षक सातारा मा.उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी श्री डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करुन सदर आरोपी म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला

  म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 79 / 2019 भारतीय दंडविधान संहिता कलम 395 394 511 मधील फरार आरोपी भाऊसो अंतु चव्हाण राहणार वाकी हा दिनांक 24 एप्रिल 2019 पासून फरारी होता अनेक ठिकाणी सदर आरोपीचा शोध घेतला परंतु वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता त्यामुळे माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी विभाग यांचेकडील यांचेकडील तपास पथकातील कर्मचारी यांच्या मदतीनेवरील आरोपीचा शोध घेऊन त्याला आज रोजी सदर गुह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आले असून अटकेची कारवाई चालू आहे त्याचप्रमाणे सदर कामगिरीमध्ये उपविभागीय कार्यालयाकडील पथकातील कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल बर्गे चंदनशिवे वाघमोडे पवार तसेच म्हसवड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भावीकट्टी व कर्मचारी यांनी भाग घेतलेला होता.

Related Stories

संतांचे साहित्य,विचार प्रेरणादायी : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Kalyani Amanagi

अनावधानाने ‘गोळी’ सुटली

Patil_p

सोलापुरात कोरोनाचे नवे 11 रुग्ण, तिघांचा बळी

Archana Banage

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

datta jadhav

कण्हेर योजनेचे पाणी शाहूपुरीवासियांच्या घराघरात पोहोचले

datta jadhav

सांगली जिल्हय़ात आज कोरोनाचे चार बळी, नवे 95 रूग्ण

Archana Banage
error: Content is protected !!