Tarun Bharat

दर्शन घेऊन परतत असताना रेल्वेच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू

कुर्डुवाडी / प्रतिनिधी

दर्शन घेऊन घराकडे परतताना रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाली. ही घटना शुक्रवार दि.१७ रोजी दु.२.३० वा पूर्वी लऊळ ता.माढा येथे घडली. आशाबाई विनायक जानराव वय ७२ रा. लऊळ ता.माढा असे या अपघातातील मृत वृद्धेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वृद्ध महिला लऊळ गावातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन घराकडे रेल्वे रुळ ओलांडून येत असताना रेल्वेची जोरात धडक बसून जानराव या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे आणले असता त्या उपचारापूर्वीच मयत झाल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची कुर्डुवाडी पोलिसांत आकस्मात मयत म्हणून नोंद झाली असून पुढील तपास सहा पो फोजदार पाटील हे करीत आहेत.

Related Stories

राज्य उत्पादन पथकावर मद्य माफियांचा हल्ला

Archana Banage

वैराग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर : त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 124 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

कोविड लसीकरणाचा ड्राय रनमध्ये १०० आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रात्यक्षिके

Archana Banage

सोलापूर : पायी आषाढीवारी परवानगीसाठी वारकरी मंडळाकडून भजन आंदोलन

Archana Banage

सातारा : तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

Archana Banage
error: Content is protected !!