Tarun Bharat

दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश चव्हाण

Advertisements

प्रतिनिधी /सातारा :

उपेक्षित, वंचित व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य दलित महासंघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी लोकशाहीर आण्णाभाऊ कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची निवड महासंघाचे संस्थापक प्रा. मधुकर वायदंडे यांनी केली. या निवडीमुळे संघटनेला आक्रमक चेहरा मिळाला असून लवकरच जिल्हाभर संघटनेची नव्याने बांधणी करुन युवकांना त्यात संधी देणार असल्याचे निवडीनंतर चव्हाण यांनी सांगितले.

कराड येथे हॉटेल कृष्णा पॅलेसमध्ये दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मधुकर वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हय़ातील कार्यकर्त्याची बैठक पार पडली. यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याबरोबर कार्यकर्त्यानी दलित महासंघात प्रवेश केला. उमेश चव्हाण यांनी दलित महासंघात यापूर्वी काम केले असून सध्या ते महाराष्ट्र राज्य फकिरा बिग्रेड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समितीच्या माध्यमातून वंचित, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत.

या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून पारधी हक्क अभियान राबवून त्यांनी पारधी समाजाला शिक्षण, रोजगार तसेच घरे मिळवून देवून मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील गुन्हेगारी कमी करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या निवडीमुळे जिल्हय़ात नव्याने दलित महासंघाचा झंझावात सुरु होईल. संघटनेची ताकद वाढवण्याबरोबर तळागाळातील लोकाना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  प्रा. मधुकर वायदंडे यांनी सांगितले.

यावेळी संतोष थोरवडे, दलित महासंघ युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे, गीता जगदाळे, माणचे सर्जेराव कांबळे, कारंडवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास साळुंखे, मनिषा पाटील, गौतमी छापखाने, रेखा सकट, नबस्सुम शेख, सर्जेराव कांबळे, आनंदा बडेकर, क्रांतिवीर वायदंडे, विकी घाटे, इंदुताई साळी, सुवर्णा बडेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रस्ताविक सुधाकर वायदंडे यांनी तर आभार संतोष थोरवडे यांनी मानले.

Related Stories

सांगरुळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद

Archana Banage

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

datta jadhav

साताऱयातील चार जुगार अड्डय़ांवर छापे

Patil_p

कोविड केअर, हेल्थ सेंटरसाठी सुविधा अद्ययावत करा : जिल्हाधिकारी

Archana Banage

सोलापूर : रेशन घोटाळ्याच्या मुळावरच खासदार ओमराजे यांचा घाव

Archana Banage
error: Content is protected !!