Tarun Bharat

दवर्ली ‘झेडपी’ मतदारसंघात चुरशीची लढत

Advertisements

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व आरजीने आपले उमेदवार नक्की केले आहेत. आप व तृणमूल काँग्रेस यांनी अद्याप आपले उमेदवार निश्चित केलेले नाहीत. गुरुवार दि. 6 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल.

भाजपने या मतदारसंघात नावेली मतदारसंघाचे मंडळ अध्यक्ष परेश नाईक यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी ते आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. आरजीचे उमेदवार ऍड्रय़ू रिबेलो यांनी काल मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाने लिओन रायकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

भाजपतर्फे परेश नाईक

भाजपने मंडळ अध्यक्ष परेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परेश नाईक हे गेली अनेक वर्षे नावेली मतदारसंघात पक्षाचे कार्य करीत आहेत. परेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना स्थानिक आमदार उल्हास तुयेकर यांच्याशी चर्चा केली होती.

काँग्रेसतर्फे लिओन रायकर

काँग्रेस पक्षाने लिओन रायकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. लिओन रायकर हे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचे खंदे समर्थक मानले जातात. लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तेव्हा लिओन रायकर यांनी देखील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हल्लीच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आरजीचे ऍड्रय़ू रिबेलोंचा अर्ज

आरजीचे उमेदवार ऍड्रय़ू रिबेलो यांनी काल मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी काँग्रेस व भाजपवर टीका केली. हे दोन्ही पक्ष लोकांची दिशाभूल करीत आहेत. लोकांच्या समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. आपले पहिले प्राधान्य असेल ते पर्यावरण जतन करण्याचे. आज पर्यावरण जतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण स्व. फा. बिस्मार्क यांच्या सोबत पर्यावरण जतनासाठी काम करीत होतो, असे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले.

भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत

दवर्ली मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व ठेवले आहे. उल्हास तुयेकर हे या मतदारसंघातून सलगरित्या दोन वेळा निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाल्याने, या मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

Related Stories

फोंडा तालुक्यात जोरदार पाऊस

Amit Kulkarni

केंद्राकडून मिळणाऱया अनुदानात 22 टक्क्यांनी घट

Amit Kulkarni

विधानसभा अधिवेशन घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा घडवावी

Patil_p

पेडणेसाठी ‘सेटलाईट हॉस्पिटल’ साकारणार

Amit Kulkarni

इंधन दर, महागाईवरून काँग्रेसची भाजपवर टीका

Amit Kulkarni

जागतिक छायाचित्र चषकासाठी मांगीरीश पालकरची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!