Tarun Bharat

दशकांपूर्वीचा ‘विनोद’ ऑलिम्पिक उद्घाटन संचालकांना भोवला

पदावरुन झाली हकालपट्टी, प्रारंभीच आणखी एक विघ्न

वृत्तसंस्था /टोकियो

कोरोनाच्या संकटकाळात आलेल्या ऑलिम्पिक महास्पर्धेला प्रारंभापासूनच काही विघ्नांना तोंड द्यावे लागत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तोंडावर आलेले असताना, उद्घाटन कार्यक्रमाचे संचालक केंटारो कोबायशी यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची वेळ ऑलिंपिक समितीवर आली.

या हकालपट्टीचे कारण त्यांनी 1998 मध्ये एका मनोरंजन कार्यक्रमात ज्यूंच्या हत्याकांडाचा उल्लेख असणारा विनोद केला, हे आहे. या विनोदाची व्हिडीओ क्लिप नुकतीच व्हायरल झाल्याने ते अडचणीत आले आहेत. दुसऱया महायुद्धात जर्मनीत हजारो ज्यू लोकांचे हत्याकांड झाले होते. या हत्याकांडाचा उल्लेख ‘होलोकॉस्ट’ असा केला जातो. मानवी इतिहासातल्या या अत्यंत निर्घृण मानवसंहारासंबंधी त्यांच्या या कुचेष्टायुक्त उल्लेखामुळे त्यांना 23 वर्षांनंतर ऑलिंपिक उद्घाटन कार्यक्रम संचालकपद गमवावे लागले आहे.

‘उद्घाटन सोहळा अवघ्या 24 तासांच्या अंतरावर असताना असा निर्णय घ्यावा लागला असल्याने याचा अनेक घटकांवर परिणाम होऊ शकतो. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो’, असे आयोजन समितीचे अध्यक्ष सेईको हाशिमोतो म्हणाले. टोकियो ऑलिम्पिक यजमानपद जाहीर झाल्यानंतर 2013 पासूनच सातत्याने विविध वादंगाच्या भोवऱयात राहिले आहे. टोकियोला यजमानपद दिले जावे, यासाठी संलग्न सदस्य राष्ट्रांना लाच दिली गेली होती, असेही उघडकीस आले होते. त्या वादामुळे जपान ऑलिम्पिक समितीचे तत्कालीन अध्यक्ष व आयओsसी सदस्य ताकेदा यांना राजीनामाही द्यावा लागला होता. अगदी याच आठवडय़ात उद्घाटन सोहळय़ात ज्यांचे संगीत वापरले जाणार होते, त्या कम्पोजर केईगो ओयामदा यांनाही पदच्यूत केले गेले आहे.

जर्मनीचा व्हेटर म्हणतो, नीरज उत्तम ऍथलिट, पण, मला नमवणे कठीण!

नवी दिल्ली : जर्मनीचा सुपरस्टार भालाफेकपटू जोहानस व्हेट्टर व नीरज चोप्रा मैदानाबाहेर एकमेकांचे उत्तम मित्र आहेत. पण, जेव्हा स्पर्धेत एकमेकांविरोधात लढायचे असते, त्यावेळी ही मैत्री बाजूला ठेवली जाते, याची प्रचिती व्हेट्टरने गुरुवारी पुन्हा एकदा दिली. ‘नीरज चोप्रा उत्तम ऍथलिट आहे. मात्र, तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये मला नमवू शकणार नाही’, असे व्हेट्टर येथे म्हणाला.

माजी वर्ल्ड चॅम्पियन व्हेट्टर यंदा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यासाठी फेवरीट आहे तर नीरज चोप्राकडे ऍथलेटिक्समधील पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी भारताचे बेस्ट बेट मानले जाते.

‘वर्षातून किमान दोन वेळा नीरज उत्तम भालाफेक करतो. फिनलंडमध्ये त्याने 86 मीटर्सची केलेली फेक लक्षवेधी होती. जर तो तंदुरुस्त असेल व पूर्ण बहरात असेल तर तो यापेक्षा सरस मजल सहज गाठू शकतो. विशेषतः त्याचे तंत्र यात अधिक महत्त्वाचे ठरते’, असे व्हेट्टरने नमूद केले. व्हेट्टर व नीरज यांची पहिली भेट 2018 मध्ये जर्मनीतील ओफेनबर्ग येथे झाली. त्यानंतर ते दोघेही एकाच फॅसिलिटीत एकत्र सराव करत होते.

चोप्रा त्यावेळी 3 महिन्यांच्या कालावधीसाठी जर्मनीत आला होता. आघाडीचे प्रशिक्षक वेर्नर डॅनिएल्स यांच्याकडून नीरजने त्यावेळी मार्गदर्शन घेतले. 3 वर्षांनंतर फिनलंड येथे मागील महिन्यात हे दोघे पुन्हा आमनेसामने भिडले आणि हेलसिंकी येथून त्यांनी एकाच कारने एकत्रित प्रवासही केला.

‘नीरज चांगला मित्र आहे. आम्ही हेलसिंकी ते कुओर्तने हा 4 तासांचा प्रवास कारने केला. भालाफेक, कुटुंब आणि बऱयाच बाबतीत आम्ही संवाद साधला’, असे व्हेट्टरने नमूद केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक इव्हेंटला दि. 4 ऑगस्ट रोजी सुरुवात होईल. त्यानंतर दि. 7 ऑगस्ट रोजी फायनल होणार आहे.

Related Stories

भारतीय बॅडमिंटन संघाची मलेशियावर मात

Patil_p

सौरभ गांगुलींना हृदयविकाराचा ‘सौम्य’ झटका

Patil_p

सिडनी सिक्सर्सचा होल्डरशी तीन सामन्यांसाठी करार

Patil_p

आफ्रिदीच्या सर्वोत्तम संघात सचिन, लाराला स्थान नाही

Patil_p

सचिनचा कोरोनाविरुद्ध मास्टरस्ट्रोक

Patil_p

कोलकात्याविरुद्ध लखनौचे पारडे जड

Patil_p