Tarun Bharat

हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या 4 दहशतवाद्यांना अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मूमध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा पर्दाफाश करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक उत्तर प्रदेशातील शामली येथील आहे. इझहार खान असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानात बसलेला जैशचा कमांडर मुनाझीरने त्याला अमृतसरजवळून शस्त्रे गोळा करण्यास सांगितले होते.

जम्मूच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले, जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे दहशतवादी ड्रोनद्वारे टाकण्यात आलेली शस्त्रे गोळा करण्याचा आणि काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना पुरवठा करण्याच्या तयारीत होते. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोटारसायकलमध्ये आयईडी स्फोटकं लावून स्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता.

अटक करण्यात आलेल्या इझहार खानला पाकस्थित कमांडरने पानिपत ऑईल रिफायनरीची रेकी करण्यास सांगितले होते. त्याने ही रेकी करून व्हिडिओ पाकिस्तानला पाठविला. इतर दहशतवाद्यांना अयोध्येतील राम मंदिराची रेकी करण्याचे काम देण्यात आले होते, परंतु त्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली.

Related Stories

अजब.. युवतीचा 80 वर्षीय वृद्धाशी विवाह

Patil_p

सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी करुया !

Abhijeet Shinde

12 आमदारांचे निलंबन रद्द

Patil_p

ऊस-साखर उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता

Patil_p

RSS ची सहा कार्यालये बॉम्बने उडविण्याची धमकी

datta jadhav

प्रणय वर्मा भारताचे बांगलादेशमधील राजदूत

Patil_p
error: Content is protected !!