Tarun Bharat

दहशतवादी कमांडर निसारचा खात्मा

अनंतनागमध्ये मेगा ऑपरेशन : कुलगाममध्येही चकमकीत एक दहशतवादी ठार

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांविरोधात शनिवारी मेगा ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये दहशतवादी संघटनांचा टॉप कमांडर निसार दार याचा खात्मा करण्यात आला. अनंतनाग आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक झाली. अनंतनागच्या सिरहामामध्ये दोन कुख्यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण काश्मीरमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

गेल्या तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे विशेष मेगा ऑपरेशन सुरू आहे. याचदरम्यान उत्तर काश्मीरमधील मोहिमेवेळी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर निसार दार अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. तसेच कुलगाममध्ये लष्कराचा एक स्थानिक दहशतवादीही मारला गेला आहे. अनंतनागच्या सिरहामामध्ये आणखीही काही दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. तेथे शोधमोहीम राबवली जात असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. लष्कर आणि पोलिसांनी शनिवारी पहाटे दोन्ही ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू केली होती. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये 2 ते 4 आणि अनंतनागमध्ये सुमारे 4 दहशतवादी उपस्थित असल्याचा सुगावा लागल्यानंतर उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

कोण होता निसार दार ?

निसार दार हा जम्मू-काश्मीरच्या उत्तर भागात लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मे 2021 पासून या भागात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. निसार दार हा कुलगाममधील रेडवानी येथील रहिवासी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

Related Stories

नव्या कोरोनाचा प्रवेश नाही

Patil_p

चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजार नव्हे तर 6 लाख 40 हजार

datta jadhav

ढाका येथील नदीत नौका बुडाली, 28 बळी

Patil_p

मानवी त्वचेवर 9 तासांपर्यंत जिवंत राहतो कोरोना

Patil_p

चीनमधील लँड ऑफ वॉटर

Patil_p

अमेरिकेत 24 तासात 60 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

datta jadhav