Tarun Bharat

दहशतवादी हल्ल्यात पाकमध्ये 7 बालके ठार

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

वायव्य पाकिस्तानातील पेशावर येथील एका मदरशात दहशतवाद्यांनी घडविलेल्या बाँबस्फोटात 7 बालकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत 70 जण जखमीही झाले आहेत. इस्लामविषयक व्याख्यान या जामिया मिलिया झुबैरिया मदरशात सुरू असताना इस्लामी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविल्याचे पोलिस अधिकाऱयांनी सांगितले. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी स्फोटाच्या पद्धतीवरून तो कोणत्यातरी जहाल इस्लामी संघटनेकडून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

Related Stories

अपघातानंतर लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav

कोरोनामुळे 1.88 लाख कोटींची निर्यात ऑर्डर रद्द

Patil_p

एस. एम. कृष्णांची राजकीय निवृत्ती

Patil_p

शस्त्र व्यापाऱयाला भारताच्या अधीन करण्याचा आदेश

Patil_p

दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये 800 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह

Abhijeet Khandekar

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात

datta jadhav