Tarun Bharat

दहशतवादी हल्ल्यासाठी पेट्रोलपंप अन् टँकरचा वापर?

दिल्ली पोलिसांकडून कट उधळून लावण्याची तयारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सणासुदीच्या काळात दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा इनपुट दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी इनपुटनंतर त्वरित अधिकाऱयांसोबत बैठक घेत दिल्लीत सतर्कता वाढविण्यात आली आहे. या बैठकीत दहशतवादी हल्ल्यांचे कट उधळून आणण्यासाठी उपाययोजना देखील निश्चित करण्यात आली.

दहशतवाद्यांना स्थानिक लोकांकडून समर्थन मिळविण्यापासून कशाप्रकारे रोखण्यात यावे यावरही चर्चा करण्यात आली. स्थानिक गुन्हेगार, गँगस्टर आणि धार्मिक कट्टरतावादी अशाप्रकारच्या हल्ल्याकरता मदत करू शकतात.

पेट्रोल पंप आणि पेट्रोल टँकर्सना लक्ष्य केले जाऊ शकते अशाप्रकारचा इनपुट असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. आयुक्तांनी सणासुदीचा काळ पाहता पोलीस उपायुक्तांना दहशतवादविरोधी उपाययोजनांवर भर देणे, गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील रस्त्यांवर होणारे गुन्हे आणि संघटित गुन्हेगारीच्या स्थितीचा आढावा घेत आयुक्तांनी गँगस्टर्सच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना केली आहे.

Related Stories

अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ

Archana Banage

बेडरुम आणि टॉयलेट…चक्क गाईसाठी

Patil_p

नागरिकत्व सुधारणा कायद्याला तात्काळ बंदी नाही : सुप्रीम कोर्ट

prashant_c

‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला शांततेसाठीचे नोबेल

Patil_p

भारत-चीन सैन्यांत चकमक; कर्नलसह तीन जवान शहीद

datta jadhav

माजी राष्ट्रपती कोविंद यांना झेड प्लस सुरक्षा

Patil_p