Tarun Bharat

दहशतवाद्यांकडून होतोय चिनी पिस्तुलांचा वापर

श्रीनगर / वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसात सीमाभागात संशयित ड्रोन आढळण्याचे प्रमाण वाढले असतानाच आता दहशतवाद्यांकडून चिनी पिस्तुलांचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. फक्त जम्मू विभागात गेल्या काही दिवसात पोलीस, सेना आणि बीएसएफने ड्रोनमधून फेकलेली 16 चिनी पिस्तुले जप्त केली आहेत तर पकडण्यात आलेल्या संशयितांकडून अशी 20 पिस्तुले मिळाली आहेत. या पिस्तुलातील बहुतेक पिस्तुले चिनी आहेत तर काही पाकिस्तानी बनावटीचीही आहेत.

जम्मू काश्मीर भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना सीमेपलीकडून आता एके-47 ऐवजी चिनी पिस्तुलांचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे. दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करणाऱया संघटनांनी त्यांच्या रणनितीमध्ये हा बदल केला असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी प्रामुख्याने एके-47 रायफल्सचा वापर दहशतवादी सर्रास करत होते. मात्र आता चिनी पिस्तुलांचा वापर वाढला आहे.

चिनी पिस्तुले एके 47 च्या तुलनेत वजनाला खूपच हलकी आणि लांबीला कमी आहेत. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून अशी पिस्तुले पाठविणे अधिक सहज आणि सोपे बनले आहे. सीमापार येणाऱया ड्रोनमधून अशी पिस्तुले येत आहेत. चिनी पिस्तुले साधारण 1 किलो वजन आणि 5 ते 9 इंच लांबीची आहेत. ड्रोनच्या माध्यमातून 10 किलोपर्यंत वजन पाठविता येत असल्यामुळे अशी शस्त्रे पुरविणाऱया संघटना दहशतवाद्यांपर्यंत अशी शस्त्रे पुरवत आहेत.

Related Stories

स्वदेशी कार्बाइन सैन्यात सामील होणार

Patil_p

रानडुकरांना मारू देण्याची केरळची मागणी फेटाळली

Patil_p

जहांगीरपुरी कारवाईवर राहुल गांधींचं ट्वीट ; म्हणाले, ‘संवैधानिक मूल्ये…’

Archana Banage

कोरोनाची लक्षणे नसणाऱया रुग्णांवर घरीच उपचार

Patil_p

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड; ५० ते ६०जण अडकल्याची शक्यता

Archana Banage

‘राज्यसभे’साठी शिवसेनेची अग्निपरीक्षा

Abhijeet Khandekar