Tarun Bharat

दहशतवाद विरोधी पथकांची कारवाई

बेकायदेशीर हत्यारे व संशयित आरोपी पकडले

प्रतिनिधी/ सातारा

दहशतवाद विरोधी पथकाने साताऱयातील खेड फाटा व राजवाडा चौपाटी येथून दोन इसमांना बेकायदेशीर हत्यार घेवून फिरताना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दहशतवाद विरोधी पथकांचे पोलीस नाईक सागर भोसले व पोलीस कॉन्टेबल सुमित मोरे यांनी संशयित पृथ्वीराज संजय जाधव (वय 30 रा. लिंब) हा खेड फाटा येथे दोन तलवारी व गुप्ती घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनूसार त्याला पोलीसांनी  ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे ही हत्यारे मिळून आली. तसेच संशयित राहूल तानाजी खवले (वय 19 रा. नामदेववाडी) हा देखील राजवाडा चौपाटी परिसरात संशयित रित्या फिरताना पोलीसांना आढळून आला. याला पुढील कारवाईसाठी  मेढा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई हणमंत भोसले, केतन जाधव, अनिकेत अहिवळे, निलेश बच्छाव यांनी केली. 

Related Stories

लोकमान्य टिळकांच्या रक्षेचे कोल्हापुरात जतन!

Archana Banage

धुमाळसारखे विकृत अधिकारी कशाला पोसलेत?

Amit Kulkarni

राष्ट्रवादी ओबीसी सेल आक्रमक

datta jadhav

मलिकांचे डी-गँगसोबत थेट संबंध, कोर्टाचं निरीक्षण

datta jadhav

शाहूवाडीत आरोग्य परिचारिकेचा पतीकडून खून

Archana Banage

चांदणी चौकातील पूल येत्या 2-3 दिवसात पाडणार

datta jadhav