Tarun Bharat

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; निकाल पाहण्यात अडचणी

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या २०२१ परीक्षेचा निकाल हा,आज, १६ जुलै २०२१रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी निकाल ऑनलाईन पाहू शकणार होते. मात्र आता, विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साईट क्रॅश झाली आहे. यामुळे पालक व विद्यार्थ्यांच्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा निकाल पाहण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून या दोन्ही लिंकवर जाऊन निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर साईट डाऊन असल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थाी नाराज दिसून आले.

राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.

Related Stories

शोपियां चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

Abhijeet Shinde

कोरोनाची दुसरी लाट : RBI कडून आरोग्य क्षेत्राला 50 हजार कोटींची मदत

Rohan_P

शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 36 लाखांची मदत; बिहार सरकारची घोषणा

datta jadhav

राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार : चंद्रकांत पाटील

Rohan_P

जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर

datta jadhav
error: Content is protected !!