Tarun Bharat

दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापानच्या आधारे करणार उत्तीर्ण

दहावीचा निकाल जूनपर्यंत जाहीर करणार, अकरावी परीक्षेसाठी सीईटी परीक्षा

प्रतिनिधी/मुंबई

राज्यात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. तसेच दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात येऊन सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार. ज्या विद्यार्थ्यांना हे गुण मान्य नसतील त्यांना सामान्य परिस्थिती झाल्यावर पुन्हा परीक्षा देऊ शकतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

गायकवाड म्हणाल्या, सर्व घटकांशी सखोल चर्चा करून 10 वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण, दहावीचे गफहपाठ – तोंडी परीक्षाö प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण आणि विद्यार्थ्यांचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल 50 गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण 100 गुण देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

तसेच एसएससी मंडळामार्फत जून 2021 पर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोव्हिड परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षा देता येणार आहे. विशेषत: पुन्हा परिक्षेला बसणाऱया (रिपीटर) आणि काही ठराविक विषय घेऊन परिक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांना देखील मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण केले जाईल.

जून अखेर लागेल निकाल

मंडळामार्फत जून 2021 अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

`अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा`

राज्यातील 10 वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे. तर 11 वी परीक्षेसाठी पर्यायी सीईटी घेण्यात येणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांना ती देता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. ही सीईटी 100 गुणांची दोन तासांची बहुपर्यायी परीक्षा असणार आहे. सीईटी देणाऱयांना 11वी प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि नंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापन देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली. विशेषत: ही सीईटी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे. सीईटी साठीची तारीख लवकरच जाहीर करू यामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

 कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत द्या

कोरोनामुळे महाराष्ट्रात आजपर्यंत 92 हजार 225 नागरिकांचा मफत्यू झाला आहे. यामुळे अनेक मुले अनाथ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात 1 ली ते 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कोविडमुळे मफत्यू पावल्याच्या घटना घडत असताना या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक मफत पावल्यामुळे त्यांचे छत्र हरवल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला आहे. या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी त्यांना आर्थिक मदत सूरू करण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत.

Related Stories

राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या?; चार कर्मचारी बनणार मुख्य साक्षीदार

Archana Banage

जिह्यात पोस्ट बॅकेकडून 15 कोटीचे वाटप

Patil_p

‘आरटीई’साठी उद्यापर्यंत मुदतवाढ

datta jadhav

कुख्यात कल्याणी देशपांडेला 7 वर्ष सक्तमजुरी, 10 लाखांचा दंड

datta jadhav

सातारच्या सिंग्नल यंत्रणेचे पोल-खोल

Patil_p

चंदगड तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणाच्या अडचणी संपता संपेनात

Archana Banage