Tarun Bharat

दहावी पेपरमधील प्रश्नांमुळे भाजपकडून विरोधी पक्षनेते टार्गेट

प्रतिनिधी / मडगाव

इंग्रजी विषयातील प्रश्नांमुळे सद्या भाजप सरकारची बरीच कोंडी झाली आहे. त्यात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी रविवारीच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करताना म्हटले होते की, प्रश्नपत्रिकेत उपस्थित झालेल्या प्रश्नावरून गोव्याच्या सद्याच्या परिस्थितीवर प्रकाश पडला आहे. या ट्विट मुळे काल मडगाव भाजप मंडळगाने त्यांच्यावर जोरदार टिका केली.

इंग्रजी विषयातील प्रश्न पत्रिकेतून गोव्याच्या संदर्भात चुकीचा संदेश दिला आहे. त्याचा विपरित परिणाम युवा पिढीवर होईल अशी शक्यता व्यक्त करून मडगाव भाजप मंडळाचे प्रवक्ते शर्मद पै रायतूरकर यांनी ही प्रश्नपत्रिका काढणाऱयांवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात त्यांना पुन्हा पेपर काढण्यास बंदी घालावी अशी मागणी केली. तसेच शिक्षकी पेशातून बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.

शिक्षण क्षेत्र हे पवित्र मानले जाते, त्याच क्षेत्रातून राजकारण करण्यात आले. त्यातून युवा पिढीची मने दुषित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न उपस्थित करून गोव्यासंदर्भात चुकीचे चित्र उभे करतानाच भीतीचे वातावरण निर्माण केल्याने सर्वांनीच त्याचा निषेध करायला पाहिजे असे श्री. रायतूरकर म्हणाले.

Rया प्रश्नाचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केल्याचा आरोप यावेळी श्री. रायतूरकर यांनी केला. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारर्किदीतील शैक्षणिक धोरणच विद्यमान भाजप सरकार राबवित असल्याचे हल्लीच दिगंबर कामत यांनी म्हटले होते. मात्र, आत्ता ते टिका करतात. यावरून ते स्वता यु टर्न मारतात. यावरून असा प्रश्न उपस्थित होत आहे की, त्यांची प्रसिद्धी पत्रके काढणारी व्यक्ती एक असावी व ट्विटर हाताळणारी दुसरी व या व्यक्तीला त्यातील गंधही ही नसावा. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या पदाची शान घालविल्याची टिका यावेळी करण्यात आली.

दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना गोव्यातील युवक पोर्तुगीज पासपोर्ट करीत होते व विदेशात जात होते, त्यावेळी त्यांना का रोखण्यात आले नाही की त्यांची थट्टा केली जाते असा सवालही उपस्थित करण्यात आला. प्रत्येकाला आपले जीवन मान उंचावयाचे आहे. अशा वेळी पोर्तुगीज पासपोर्ट करून विदेशात जातात, अशा वेळी त्यावरून राजकारण करणे शोभत नसल्याचे ते म्हणाले.

पेपर काढणारी व्यक्ती फितूर असावी

इंग्रजी विषयात वादग्रस्त प्रश्न काढणारी व्यक्ती सरकारच्या विरोधकांना फितूर असावी अन्यथा विरोधी पक्षनेते अशा प्रकारे ट्विट करणार नव्हते. उलट या गोष्टीचा निषेध केला असता. राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सक्षमरित्या काम करीत आहे. ते बघवत नसल्याने सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला मडगाव भाजप मंडळाचे सरचिटणीस नवीन पै रायतूरकर तसेच शैला पार्सेकर यांची उपस्थिती होती.

Related Stories

एस्टेलर अकादमीच्या वास्को केंद्राचे उद्घाटन

Amit Kulkarni

पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

Amit Kulkarni

सासष्टीतही उघड लँडमाफियांचे कारनामे

Omkar B

आंतराष्ट्रीय आदिवासी दिन बोरीत साजरा

Omkar B

’कचऱयातून कलाकृती’ संकल्पनेवर ’थीम पार्क’

Amit Kulkarni

‘नवीन शैक्षणिक धोरणा’साठी सरकारने पावले उचललीय…

Amit Kulkarni