Tarun Bharat

दहावी, बारावी परीक्षांसाठी आजपासून अर्ज

  • खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्यांसाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत 
Advertisements


ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आजपासून (दि. 25) ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यां 13 फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज भरता येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.


मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज सोमवारपर्यंत (दि. 25) सादर करता येतील. त्याअनुषंगाने नाव, नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा मोबाईल आणि  ई मेलवर प्रमाणपत्र उपलब्ध होतील. अशा विद्यार्थ्यांनी स्वतः चे प्रमाणपत्र http: // form 17. mh-hsc.ac.in आणि  http: // form 17.mh-ssc.ac.in या वेसाइटवरून घ्यायचे आहेत. 


तसेच परीक्षेसाठी नियमित शुल्कासह 13 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे, असेही भोसले यांनी सांगितले. 

Related Stories

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 92 हजार 589 वर

Rohan_P

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,60,924 वर

Rohan_P

दिल्लीत एका दिवसात 310 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 7 हजार 233

Rohan_P

कोरोनाचा कहर! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 594 डॉक्टरांचा मृत्यू

Rohan_P

गुगल, फेसबुकने उत्पन्न जाहीर करावे; ऑस्ट्रेलिया सरकारचा आदेश

datta jadhav
error: Content is protected !!