Tarun Bharat

दहावी, बारावी सतरा नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

प्रतिनिधी / कोल्हापूर

दहावी, बारावीच्या 2021 मध्ये हेणाऱया परीक्षेचे सतरा नंबर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 29 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज भरावा. 31 डिसेंबरपर्यंत प्रवेश शुल्काच्या पावतीसह ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट, दोन फोटो, मुळ कागदपत्रांसह केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावा. केंद्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळाकडे जमा करावयाचा आहे. यासंदर्भातील सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

खासगीरित्या दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर बारावीसाठी http://form17.mh-hsc.in या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचा आहे. ऑनलाईन अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट साईजचा फोटो आदी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. प्रिंट काढून दोन प्रतीत कागदपत्रे विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करावी. दहावीसाठी 1 हजार 100 तर बारावीसाठी 600 रूपये प्रवेशशुल्क आहे. तरी विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर भेट देवून दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी केले आहे.

Related Stories

कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील ५ जणांची चाचणी निगेटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर जिल्हयासाठी एकच जनता कर्फ्यू करावा : माजी आमदार चंद्रदीप नरके

Archana Banage

कोल्हापूर : थेट पाईप लाईन भराव मांगेवाडी जवळ खचल्याने अपघाताचा धोका

Archana Banage

स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे उपक्रम

Archana Banage

आजरा नगरपंचायतीमध्ये स्वतंत्र मुख्याधिकारी देण्याची मागणी

Archana Banage

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

Archana Banage