Tarun Bharat

दहा वर्षांमध्ये अमूलाचा व्यवसाय पाच पटीने वाढून 52 हजार कोटींच्या घरात

नवी दिल्ली : देशातील प्रमुख बँडमध्ये सहभागी असणाऱयापैकी एक अमूल ब्रँडचा एकूण व्यापर वित्त वर्ष 2019-20 मध्ये 38,542 कोटीवर राहिला आहे. मागील दहा वर्षाच्या प्रवासात कंपनीच्या व्यापारात जवळपास पाच पटीने ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. अशी माहिती गुजरात को ऑपर्रेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ)यांनी शनिवारी दिली आहे. जीसीएमएमएफ यांच्याकडून अमूल ब्रँडची उत्पादकांना उत्पादन आणि विक्री करण्यावर काम केले जात असल्याचे सांगितले आहे. परंतु एकूण युनियन व्यापार 52 हजार कोटी रुपयावर राहिला आहे. यासोबतच अमूलने 2024-25 पर्यंत एक लाख कोटी रुपयाचा व्यापार प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले असल्याचे स्पष्टीकरण केले आहे. नुकतीच कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यामध्ये जीसीएमएमएफ समूह आणि त्याच्यासोबत असणाऱया युनियन सदस्यांच्या मदतीने अमूल ब्रँडचा  एकत्रितपणे क्यापार मागील दहावर्षामध्ये 52 हजार केटी रुपयापेक्षा अधिक राहिल्याचे स्पष्ट केले आहे. हाच आकडा दहा वर्षाच्या अगोदर 8,005 कोटी रुपयावर होता. अमूल जगातील डेअरी ऑर्गनायझेशनमध्ये 2011 मध्ये 18 नंबरवर राहिली होती. परंतु सध्याच्या घडीला हेच स्थान 9 नंबरवर कायम ठेवले आहे. दूधाच्या उत्पादनांमध्ये भारताचे योगदान हे 50 टक्के जागतिक पातळीवर असून भारत 8 लाख कोटी रुपयांच्या दूधाचे उत्पादन करतो.

Related Stories

ऍडव्हान्स एआयसाठी ‘एलजी’ 733 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टीकडून नव्या विक्रमाची नोंद

Patil_p

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वनस्पती तेलाची आयात वाढली

Patil_p

जियोफोन मिळणार 6 हजार 499 रुपयांना

Patil_p

भारतामध्ये ओप्पोकडून ई-स्टोअर लाँच

Patil_p

टेक महिंद्राकडून अलिस इंडिया, ग्रीन इन्वेस्टमेंट्स अधिग्रहणाला मंजुरी

Patil_p