Tarun Bharat

दहा हजारांच्या लाचप्रकरणी दोघांवर कारवाई

कराड येथील वैधमापन शास्त्र कार्यालयावर छापा

प्रतिनिधी/ कराड  

येथील वैधमापन शास्त्र कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी छापा टाकला. दहा हजारांची लाच मागितलेल्या दोघा अधिकाऱयांना पकडण्यात आले. या कारवाईने वैधमापनशास्त्र कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे. 

लहू उत्तम कुठे निरीक्षक (अंबाई डिफेन्स कॉलनी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,) चंद्रकांत राजाराम जाधव (रा. आंबेगाव ता. कडेगाव जि. सांगली)  अशी कारवाई झालेल्या निरिक्षक व क्षेत्र अधिकाऱयांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या पायोनियर प्रोडक्ट कंपनीचे स्टार किंग कुलंट वरील लेबलवर व्हेन पॅकड व एमआरपी हे शब्द चुकीच्या पद्धतीने छापलेले होते. त्यामुळे पायोनियर प्रोडक्ट कंपनीवर कारवाई न करण्यासाठी दोघा अधिकाऱयांनी दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार झाली होती. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के यांच्या पथकाने खात्री करून संशयितांना पकडले. त्यांच्यावर कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब

Archana Banage

सातारच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे

Patil_p

सातारा जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार-विजयराजे ढमाळ

Archana Banage

‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले”

Archana Banage

धामणेरमध्ये दहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

datta jadhav

जिल्ह्यात तीन ठिकाणी मटका, जुगार अड्डयांवर छापे

datta jadhav