Tarun Bharat

दहीहंडी साजरी करणारच: संदीप देशपांडे

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी साजरी करण्यावर सरकारने बंदी घातली आहे. परंतु मनसेने दहीहंडी साजरी करणारच असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी राज्यात सुरु असलेली जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करत आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आम्ही दहीहंडी साजरी करणारच आहोत. आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांवर बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. आमच्यावर कितीही केसेस टाका. आम्ही अस्वल आहोत. आमच्यावर खूप केस आहेत, असंही ते म्हणाले.

Related Stories

कोल्हापूर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ

Archana Banage

महाराष्ट्र : अन्यथा दोन दिवसात लॉकडाऊनचा निर्णय

Archana Banage

शिक्षण विस्तार अधिकारी कांबळेंच्या चौकशीसह तत्काळ कारवाई करा

Archana Banage

राज्यात थेट सरपंचपदासह १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

Archana Banage

काश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर काश्मीरमध्ये सर्वाधिक हत्या- संजय राउत

Abhijeet Khandekar

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

Archana Banage
error: Content is protected !!