Tarun Bharat

दही घेण्यासाठी थांबवली रेल्वे…

Advertisements

आपला शेजारी देश (खरंतर आपला शत्रूदेश) पाकिस्तानमध्ये काय घडेल आणि काय नाही हे सांगता येणं कठीण आहे. तेथील एका प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या एका घटनेमुळे त्या देशांत बेजबाबदारपणा किती वाढला आहे, हे दिसून येतं. तेथील एका रेल्वे चालकानं (रेल्वे ड्रायव्हर) दही खरेदी करण्यासाठी चक्क रेल्वे वाटेतच थांबविली. हे वृत्त कळताच त्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्याबरोबर त्याच्या साहाय्यकालाही काढून टाकण्यात आलं आहे.

कहर म्हणजे या घटनेचं व्हिडीओ चित्रण झालं असून हा व्हिडीओ मिडियावरुन व्हायरलही होत आहे. चालकानं रेल्वे थांबविली, आणि तो रस्त्याकडेच्या दुकानात दही खरेदीसाठी गेला. दही खरेदी आटोपल्यानंतर तो पुन्हा रेल्वेत परतला आणि त्यानं इंजिन सुरु करुन रेल्वे पुढं नेली. हे सारं दृष्य व्हिडीओत असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहूनच पाकिस्तानच्या रेल्वे विभागाला तातडीनं कारवाई करणं भाग पडलं. नंतर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात आली. याघटनेनंतर पाक सरकार जागं झालं आहे. रेल्वे चालकांसाठी कठोर नियम आता करण्यात आले आहेत. कोणत्याही अधिकृत कारणास्तव किंवा तातडीच्या कारणास्तव रेल्वे वाटेत थांबवायची नाही. रेल्वे सुरु असताना चालकानं किंवा त्याच्या साहाय्यकानं मोबाईलचा उपयोग करायचा नाही. रेल्वेसह कोणालाही सेल्फी घेण्याची अनुमती द्यायची नाही, इत्यादी नियम आता करण्यात आले आहेत.

Related Stories

‘वादळी’ वर्ष…

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रे आता पुस्तकरूपात!

Tousif Mujawar

समुद्रात सापडला पंख असलेला मासा

Patil_p

जगातील अनोखी घरं

Patil_p

दगडूशेठ मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना

prashant_c

रशियात कोरोनामुळे दिवसात 1000 मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!