Tarun Bharat

दाऊदच्या दबावामुळे हा निर्णय सरकारने बदलला : चंद्रकांत पाटील

Advertisements

मुंबई प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. पण राष्ट्रवादी पक्ष नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं शरद पवार आणि अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलायं.
संजय राठोड यांचा राजीनामा पक्षाने दबावात आल्यानंतर घेतला. तर, अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राजीनामा घेतला. आता नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजीनामा घ्यायचा निर्णय झाला, परंतु हा निर्णय बदलला. पण हा निर्णय कोणाच्या दबावामुळे बदलला?, तर हा निर्णय दाऊदच्या दबावामुळे बदलला,” असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तसेच दाऊदच्या दबावाला घाबरून निर्णय बदलणाऱ्या या सरकारला घालवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत, असंही पाटील म्हणाले.

Related Stories

बार्शीत कोरोनाचा दुसरा बळी

Abhijeet Shinde

FTII मध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

datta jadhav

KK यांचा मृत्यू की घातपात? …यामुळं वाढलं मृत्यूचं गूढ

datta jadhav

कोल्हापूर खंडपीठाचा चेंडू आता मुख्यमंत्र्याच्या कोर्टात,मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कृती समितीस पत्र

Kalyani Amanagi

येत्या प्रजासत्ताकदिनी 10 हजार सौर कृषी पंप वितरणाचे आदेश देणार : डॉ. नितीन राऊत

Rohan_P

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!