Tarun Bharat

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा 1 कोटी 10 लाखाला लिलाव

Advertisements

खेड-घाणेखुंटच्या रवींद्र कातेंनी जिंकली बोली

प्रतिनिधी/ खेड

कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने लोटे येथे पेट्रोलपंपासाठी खरेदी केलेल्या 80 गुंठे क्षेत्रातील भूखंडाचा लिलाव मंगळवारी स्मगलिंग ऍण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन ऍक्ट (सफेमा) यांनी केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निविदा प्रक्रियेद्वारे झालेला हा लिलाव तालुक्यातील घाणेखुंट येथील रवींद्र दत्ताराम काते यांनी जिंकला. या भूखंडासाठी 1 कोटी 10 लाख 1 हजार 511 रूपयांची बोली लावली. अनामत रकमेपोटी त्यांनी यापूर्वीच 28 लाख जमा केले आहेत. बोलीतील उर्वरित रक्कम 3 महिन्यांत जमा करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 मुंबकेतील दाऊदच्या 6 मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेनंतर लोटेतील भूखंडाच्या लिलाव प्रक्रियेकडे साऱयांच्या नजरा रोखल्या होत्या. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम व कागदपत्रे सफेमामध्ये जमा करण्याची मुदत 27 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. या मुदतीत सर्वोच्च न्यायालयातील भूपेंद्र भारद्वाज यांनी साडेसत्तावीस लाख रूपयांची अनामत रक्कम व आवश्यक कागदपत्रे जमा करून लिलाव प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला होता.

  या पाठोपाठ तालुक्यातील घाणेखुंट येथील रवींद्र काते यांनीदेखील लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवताना यासाठी त्यांनी 28 लाख रूपयांची अनामत रक्कम व कागदपत्रे जमा केली होती. दाऊदच्या भूखंडासाठी 1 कोटी 9 लाख 5 हजार 500 रूपये निश्चित करण्यात आले होते. मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे टेंडर प्रक्रियेनुसार  लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेणाऱया ऍड. भूपेंद्र भारद्वाज यांनी जोपर्यंत जागेच्या सीमा निश्चित होत नाहीत, तोपर्यंत आपला लिफाफा उघडू नये, अशी अट घातल्याची माहिती पुढे आली आहे. अखेर रवींद्र काते यांनी दाऊदच्या भूखंडासाठी 1 कोटी 10 लाख 1 हजार 511 रूपयांची बोली लावत हा लिलाव जिंकला. लिलावातील उर्वरित रक्कम 3 महिन्यांत जमा करण्याचे आदेश बोली जिंकणाऱया काते यांना देण्यात आल्याचे समजते.

Related Stories

आंबोली पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप

NIKHIL_N

तेरावे-चौदावे केल्याबद्दल गावाचा बहिष्कार

Amit Kulkarni

साई मंदिर मठाधिपती श्री दादा साईंचा 65 वा वाढदिवस

NIKHIL_N

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 130 मृत्यू; 4,797 नवे रुग्ण

Tousif Mujawar

रत्नागिरी जिल्ह्यात नवे ८ पॉझिटिव्ह, तर १३ रुग्ण बरे

Archana Banage

गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने!

NIKHIL_N
error: Content is protected !!