Tarun Bharat

दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचे चेन्नईतील एसआयआयएमएस रुग्णालयात निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. शुक्रवारी त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.


विवेक यांच्या अभिनयाचे कौतुक सर्वचजण करत आले आहेत. त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते.


विवेक हे तमिळ सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे. विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.


दरम्यान, विवेक यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संगीतकार ए आर रहिमान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, विश्र्वासच बसत नाही की, अभिनेते विवेक आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही आमचे खूप मनोरंजन केले आहे. तुमची ही आठवण कायम आमच्या सोबत राहील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

Related Stories

सोनाली करणार तमाशा लाईव्ह

Patil_p

अण्णासाहेब देऊळगावकर जन्मशताब्दीपूर्ती सोहळा संपन्न

Patil_p

‘बिंडा’चे पोस्टर प्रकाशित

prashant_c

महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर आले धर्मेश सरांचे वडील

Patil_p

सामाजिक विषयावर अवधूत गुप्तेंचे पहिलेवहिले रॅप सॉंग

Patil_p

रणदीप हुड्डाच्या चित्रपटात अंकिता लोखंडे

Amit Kulkarni