Tarun Bharat

दाखवायच्या गोष्टी

Advertisements

लहानपणी एक हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यातल्या विनोदी प्रसंगात मेहमूद प्रेयसीला भेटण्यासाठी नवे कपडे घालून येतो. अंगातल्या प्रत्येक कपडय़ाला अडकवलेले दुकानातल्या किमतीचे लेबल तसेच असते. तो प्रेयसीला शर्ट, पँट, बूट, मोजे, खिशातला रुमाल वगैरे वस्तूंच्या किमती सांगतो.

कॉलेजमध्ये एखाद्या मैत्रिणीने अंगातल्या शर्टचे किंवा गॉगल्स वगैरेचे कौतुक केले की मुले शेफारून जाऊन ती वस्तू अमक्मया प्रसिद्ध दुकानातून तमक्मया किमतीला आणलेली आहे किंवा इंपोर्टेड आहे, महाग आहे वगैरे गोष्टी रंगवून रंगवून सांगताना पाहिली. लग्नसमारंभ वगैरे ठिकाणी महिला आपल्या अंगावरचा शालू/ साडी किती उंची आहे, सेलमधून घेतलेली नाही, तिची किंमत इतकी आहे असे सांगताना ऐकल्या.

सत्तरच्या दशकात स्कूटर प्रकरण दुर्मीळ होते. कंपन्यांची उत्पादनाची ताकद तोकडी होती. स्कूटर मिळण्यासाठी पाचशे वगैरे रक्कम भरून नंबर लावावा लागे. अनेक वर्षांनी नंबर येई तेव्हा गाडी मिळे. नवी गाडी चालवत कॉलेजला आलेला मुलगा कॉलर ताठ करून सांगायचा की माझ्या वडिलांनी नंबर लावायचा त्रास घेतला नाही. एका ओळखीच्या माणसाचा नंबर आला होता. त्याला इतके हजार रुपये ‘ऑन’ देऊन गाडी घेतली. मग त्याची मैत्रीण डोळे विस्फारून त्याच्याकडे पहात असे. त्या काळात विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी होती. कस्टमने पकडलेल्या आणि वितरणाला दिलेल्या वस्तू विकणारी काही दुकाने होती. मुले ती विदेशी घडय़ाळे मनगटावर मिरवीत आणि समोरच्या भोळय़ा मैत्रिणींना त्यांची मनमानी किंमत सांगून ‘प्रभाव’ पाडण्याचा प्रयास करीत. ते सगळे दिवस इतिहासजमा झाले आहेत.  मधल्या काळात जमिनी विकून किंवा अन्य मार्गाने पैसे जमवून करोडो रुपयांचे सोन्याचे सदरे परिधान करणारे पुरुष ऊर्फ गोल्डमेन अचानक प्रसिद्धीच्या झोतात येऊन गेले. पण हे लोक संख्येने खूपच थोडे. अवघे दोन-चार असतील-नसतील.  

त्यांच्या पुढचे प्रत्यक्ष बघायला मिळेल असे वाटले नव्हते.  

गेल्या आठवडय़ात ते फेसबुकवरच बघायला मिळाले. एका देखण्या महिलेचा तिच्याच प्रोफाईलवर उंची साडी आणि अलंकार परिधान केलेला फोटो पाहिला. फोटोखाली तिने नेसलेल्या साडीची किंमत, दुकानाचे नाव आणि अंगावरच्या दागिन्यांचे असेच तपशील दिलेले होते.जाहिरातबाजी अशीच बोकाळली तर अवयवारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती अवयवांच्या किमती, शस्त्रक्रियेचे खर्च, रुग्णालयाचे तपशील सोशल मीडियावर टाकतील तोही दिवस लांब नाही.

Related Stories

आपत्तीमधून शिकण्यासारखे बरेच काही!

Patil_p

अनिरुद्ध व उषेचा शृंगार

Patil_p

नको नको रे पावसा!

Patil_p

दहावीचा अभ्यास

Patil_p

सोशल मीडिया-द्वेष प्रसारक संस्कृती ?

Patil_p

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p
error: Content is protected !!