Tarun Bharat

दागिन्यांसाठी जुगाड, मास्कवर घातली नथ

Advertisements

कोरोना संक्रमणाने जीवनाचा प्रवाहच बदलला आहे. माणसाला घरातही मास्क घालावा लागेल असा विचार देखील कुणी केला नव्हता. केविड-19 पासून वाचण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. पण तरीही विवाह तसेच अन्य सोहळे सुरू आहेत. हा काळ सेल्फी तसेच इन्स्टाग्राम रीलचा आहे. अशा स्थितीत नटणे-सजणे किती महत्त्वाचे ठरते. पण गोष्ट जेव्हा महिलांची असते, तेव्हा मास्क त्यांच्या मेकअपपासून दागिन्यांनाही लपवून ठेवतो. पण आता यावर उपाय सापडला आहे. सोशल मीडियावर एका महिलेचे छायाचित्र प्रचंड शेअर होत असून यात तिने मास्कच्या वर नथ घातल्याचे दिसून येते.

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी हे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित करत ‘ज्वेलरी जुगाड लेव्हल ‘सुपर अल्ट्रा प्रो मॅक्स’ असे नमूद केले आहे. छायाचित्रात महिला एका सोहळय़ात उपस्थित असल्याचे आणि तिने गळय़ात हार तसेच अनेक दागिने घातल्याचे दिसून येते. पण महिलेच्या मास्कवरील नथ लोकांना खूपच वेगळे वाटल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Stories

1 हजार महिलांकडून शिवतांडव पाठ

Patil_p

शाहीन बागमध्ये आत्मघाती हल्लेखार!

Patil_p

नव्या कृषी कायद्यांच्या क्रियान्वयनास तात्पुरती स्थगिती

Patil_p

भारतात कोरोना रुग्णसंख्या मंदावतेय

datta jadhav

अनंतनागमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

कॅप्टन-भाजप-ढींडसा यांच्या आघाडीची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!