Tarun Bharat

दानिश फारूकचा बेंगळूर एफसीशी करार

वृत्तसंस्था/ बेंगळूर

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया बेंगळूर एफसी फुटबॉल क्लबने जम्मू-काश्मीरचा फुटबॉलपटू दानिश फारूकची नुकताच नवा करार केला.

जम्मू-काश्मीरचा 25 वर्षीय फुटबॉलपटू दानिश फारूक हा आक्रमक आणि वेगवान खेळ करण्यामध्ये तरबेज असल्याने बेंगळूर एफसी संघाने त्याच्याबरोबर दोन वर्षांच्या कालावधीसाठी नवा करार केलाय. आता आगामी एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेतील ईगल्स एफसी संघाबरोबर होणाऱया प्लेऑफ सामन्यात दानिश फारूक पहिल्यांदा बेंगळूर एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करेल. फारूक यापूर्वी जम्मू-काश्मीर बँक फुटबॉल अकादमीकडून खेळत होता. दानिशने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर जम्मू-कश्मीर बँक फुटबॉल अकादमीला  विविध वयोगटातील 12 फुटबॉल स्पर्धां जिंकून दिल्या आहेत.

Related Stories

शंकर मुथुस्वामी अंतिम फेरीत

Patil_p

युपी वॉरियर्सचा शेवटच्या षटकात थरारक विजय

Patil_p

विजेत्या टेबल टेनिसपटूंना आता समान बक्षीस रक्क्म

Patil_p

न्यूझीलंडचे माजी कसोटीवीर ब्रुस मरे यांचे निधन

Patil_p

महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा 15 मार्चपासून

Patil_p

अर्जेंटिनाचा व्हेनेझुएलावर विजय

Patil_p