वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात दानेवाडी येथील शेततळ्यात पडून बाबंरवाडीच्या बालकाचा आज शुक्रवार दि. २२ रोजी दुपारी बुडून मृत्यू झाला करण संतोष जाधव वय १३ असे या मृत झालेल्या बालकाचे नांव आसून या घटनेची नोंद कोडोली पोलीसात झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, करण हा आपल्या वडीलांच्या समवेत दानेवाडी येथे गेला होता. वडील शेतीच्या कामात व्यस्त असताना करण शेततळ्याजवळ गेला होता. तो काही वेळानंतर वडीलांना दिसला नसल्याने त्याचा शोध घेणेचा प्रयत्न केला. शेततळ्याजवळ करणचे एक चप्पंल दिसून आल्याने पाण्यात त्याचा शोध घेतला असता तो सापडला. शेततळ्यात प्लास्टीक कागद असल्याने तो पाय घसरून पडला असल्याची शक्यता वर्तविणेत आली. त्याच्या ऊंची पेक्षा पाण्याची पातळी जास्त असलेने तो पाण्यात बुडाला होता. तो सापडल्यावर तातडीने त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे दाखल केले असता उपचारापुर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.


previous post