Tarun Bharat

दापोलीत एका आठवडय़ात दोन डॉल्फीनचा मृत्यू

प्रतिनिधी/ दापोली

दापोली तालुक्यातील पाळंदे येथील समुद्रकिनाऱयावर एकाच आठवडय़ात दोन डॉल्फीन माशांचा मृत्यू ओढवल्याने निसर्गप्रेमीमधून चिंता व्यक्त होत आहे

  पाळंदे समुद्रकिनारी गेल्या आठवडय़ात एका डॉल्फीनचा मृत्यू ओढवला होता. ही बाब ग्रामस्थांनी पत्रकार व वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर वनविभाग अधिकाऱयांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा केला व मृत डॉल्फीनला समुद्रकिनारी खड्डा काढून पुरले. ही घटना ताजी असताना रविवारी दुसऱया एका डॉल्फीनचा मृतदेह समुद्रकिनारी पडलेला आढळून आला. मात्र एकाच आठवडय़ात दोन डॉल्फीनचा एकाच समुद्रकिनारी मृत्यू ओढवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत

  हे डॉल्फीन नेमके कोणत्या कारणाने मृत होत आहेत याची कारणमीमांसा होणे गरजेचे बनले आहे. सध्या वातावरणात होत असलेले बदल व उष्म्यामध्ये झालेली वाढ या संवेदनशील डॉल्फीनच्या मृत्यूस कारणीभूत ठरत नाही ना, अशी भीती निसर्गप्रेमीमधून व्यक्त होत आहे.

Related Stories

‘गणपती बाप्पा मोरया..!’

NIKHIL_N

रत्नागिरी : आंबा-काजूच्या बागा जळून खाक : कोट्यवधींचे नुकसान;

Archana Banage

युपीएससीत चमकलेल्या दाभोलीच्या सुपुत्राच्या वडिलांचा ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार

Anuja Kudatarkar

रॉक गार्डन पुन्हा गजबजणार

Anuja Kudatarkar

गोवेरीत आढळला चक्क ‘ब्लॅक पँथर’

NIKHIL_N

रत्नागिरी : कोकण मार्गावर २६ पासून ‘तुतारी एक्सप्रेस’ धावणार

Archana Banage
error: Content is protected !!