Tarun Bharat

दापोलीत झाड कोसळून सहा गाड्यांचा चक्काचूर

Advertisements

दापोली प्रतिनिधी

दापोली शहरातील वृंदावन हॉटेल समोर भलामोठा आम्रवृक्ष कोसळून चार दुचाकी व दोन चारचाकी गाड्यांचे अतोनात नुकसान झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.

सोमवारी दुपारी अचानक मोठा आवाज करत शहरातील वृंदावन हॉटेल समोरील मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. यावेळी रहदारी देखील मोठ्या प्रमाणात होती. मात्र मोठा आवाज झाल्याने अनेकांनी सावध होऊन तेथून पळ काढला. यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र यात झाडाखाली उभ्या असणाऱ्या दापोली-हर्णे रोड वरील चार दुचाकी व दोन चारचाकी गाड्यांचे अतोनात नुकसान झाले.

या घटनेमुळे दापोली हर्णे रोडवरील वाहतूक स्तब्ध झाली. दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाड कट करून वाहतूक सुरळीत केली व झाडाखाली चक्काचूर झालेल्या गाड्या बाहेर काढल्या.

Related Stories

”ताईसाहेब…आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र…”

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, पण…

datta jadhav

भाजपचे आंदोलन म्हणजे… सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा प्रकार : जयंत पाटील

Rohan_P

लॉकडाऊनमधील रत्नागिरी एसटी उत्पन्न 10 कोटी, तोटा 49 कोटी!

Patil_p

यूपी : 7 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘स्पेशल लसीकरण बूथ’

Rohan_P
error: Content is protected !!