Tarun Bharat

दापोलीत ‘ड्राय-रन’चा शुभारंभ

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड-19 वरिल लसीची ड्राय-रन शुक्रवारी 8 जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे घेण्यात आली. ही लस आल्यावर ज्यांना ही लस द्यायची यासाठी ही रंगीत तालीम होती.

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील 25 कर्मचायांची नियुक्ती आरोग्य संचालनालयाकडून करण्यात आली. यामध्ये परिचारिका, वैद्यकीय अधिकारी आदींचा समावेश होता. जिल्ह्यात तीन ठिकाणीही रंगीत तालीम झाली. यामध्ये दापोली उपजिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्षात जेव्हा लस येइल तेव्हा करिताची ही सज्जता असून ही रंगीत तालीम घेण्यात आली आहे अशी माहिती दापोली उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. महेश भागवत यांनी दिली. यामध्ये काही त्रुटी राहिल्यास त्या तात्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी ड्रायरन घेण्यात आल्याची माहिती डॉ. भागवत यांनी दिली.

यासाठी दापोली शासकीय रुग्णालयात खास टीम तयार करण्यात आली आहे. ही ड्रायरन कशा प्रकारे घेण्यात आली, त्यासाठी उभारण्यात आलेला कक्ष प्रात्यक्षिक याची माहिती उबाळे यांनी दिली. व्हेक्सिनेशन टीम ईंचार्ज म्हणून डॉ. रामतीर्थ चौगुले, ऑफिसर सुविधा सुर्वे, सुजित भागवत, सिनिअर नर्स सेजल मळेकर, दिपीका नांदगावकर व्हेक्सिनेटर साक्षी हांडे, सुपरवायझर डॉ. स्वनिल भोजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यशस्वी ड्रायरनमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

साळगावला वादळाचा मोठा तडाखा माणगाव परिसरात जोरदार पाऊस

NIKHIL_N

संगमेश्वरच्या व्यापाऱयांसाठी भाजपचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार मैदानात

Patil_p

सवणसमध्ये संक्शन पंप फोडून नदीत बुडवला

Patil_p

दोडामार्गातील युवाईला राणेंकडून मोठे अपेक्षा

NIKHIL_N

सीएसआर निधीतून सायकलींचे वाटप

Anuja Kudatarkar

कोकण मार्गावरील मेगाब्लॉक आजपासून संपुष्टात

Patil_p
error: Content is protected !!