Tarun Bharat

दापोलीत दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

वार्ताहर/ टाळसुरे

दापोली तालुक्यातील कोंढे फणसू फाटा येथे झालेल्या दुचाकी अपघातात कर्दे येथील सुयोग जाधव (27, कर्दे) याचा मृत्यू झाला तर संतोष सुर्वे (55, फणसू) व शुभम सुर्वे (23, कोंढे) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली.

 संतोष सुर्वे यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार, सुयोग जाधव, शुभम सुर्वे व ते स्वतः असे तिघेजण यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच 08, डब्ल्यू 6865) घरी जात होते. सुयोग जाधव हा दुचाकी चालवत होता. त्यांची दुचाकी कोंढे या गावी फणसू फाटय़ाजवळ आली असता सुयोग याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

 या अपघातात सुयोग याच्या नाकाला, डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. गाडीवर बसलेले शुभम सुर्वे याच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. संतोष सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱयांनी सुयोग याला मृत झाल्याचे घोषित केले. तसेच इतर दोघांवर तातडीने उपचार सुरू केले. दापोली पोलीस स्थानकात याची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे करीत आहेत.

                      …तर सुयोग वाचला असता

सुयोग हा अतिशय मनमिळावू असा युवक होता. कर्दे येथे तो राहत असून कोंडे या ठिकाणी आजोळी 2 दिवसांसाठी तो गेला होता. शनिवारी खेकडे पकडण्यासाठी तो शुभम सुर्वे व संतोष सुर्वे यांच्यासोबत गेला होता. रात्री 10 च्या सुमारास शुभम सुर्वे याच्या आईने शुभमला फोन करून लवकर घरी येण्यास सांगितले. तेव्हा सुयोगबरोबर मी 15 मिनिटात घरी येतो, असे त्याने सांगितले. खूप वेळ झाला तरी ते घरी न आल्यामुळे व त्यांचा फोन लागत नसल्याने घरातून त्यांना शोधण्यासाठी नातेवाईक बाहेर पडले. फणसू फाटा येथे आल्यावर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे त्यांना कळले. तातडीने तिघांनाही फणसू आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यात आले. तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने तिघांनाही दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जर सुयोगवर वेळीच उपचार झाले असते तर कदाचित तो वाचला असता, अशी खंत त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली

Related Stories

कोकण किनारपट्टी भागात थंडीचा कडाका वाढणार

Patil_p

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप !

Patil_p

माडखोल धरणाच्या कालव्यांची प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणार

Anuja Kudatarkar

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

Patil_p

वेंगुर्ले बाजारपेठ विविध प्रकारच्या कंदिलांनी सजली

Anuja Kudatarkar

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुंबईत प्रशिक्षण केंद्र

Patil_p