Tarun Bharat

दापोलीत वाहक व चालक यांना बेदम मारहाण

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

शुक्रवारी संध्याकाळी दापोली तालुक्यातील वळणे येथे ST चालक सचिन राजेशिर्के व ST वाहक सुरज खेडेकर यांना मारहाण झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दापोली तालुक्यातील वळणे येथे शुक्रवारी सायंकाळी दापोली दाभोळ गाडीवर कार्यरत असणारे वाहक सुरेश खेडेकर यांच्याशी प्रवाशांचा तिकीट घेण्यावरून वाद झाला. या वादातून प्रवाशांनी फोन करून त्यांच्या भावाला बोलावून घेतले व वळणे येथे गाडी थांबली असताना गाडीत चढून मारहाण केल्याचा आरोप वाहक सुरज खेडेकर यांनी केला आहे. त्यांना वाचवायला गेलेले गाडीचे चालक सचिन राजेशिर्के यांना देखील मारहाण झाल्याचा आरोप सचिन राजेशिर्के यांनी केला आहे.

घटना घडल्यावर प्रवाशांना दुसऱ्या बसमधून दाभोळकडे रवाना करण्यात आले. घटनेनंतर दापोली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा व जाबजबाब घेण्याचे काम सायंकाळ पर्यंत सुरू होते.

Related Stories

Tauktae Cyclone : नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Abhijeet Shinde

कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे चिरे घरावर आदळले

Patil_p

जिह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू , 132 नवे रुग्ण

Patil_p

सुरुंगाने सांडवा फोडला, पणदेरी धरण सुरक्षित!

Patil_p

महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Patil_p

‘वाशिष्ठी’चे कॉंक्रीट उडाले अन् सळय़ाही बाहेर!

Patil_p
error: Content is protected !!