Tarun Bharat

दापोलीत शिवभोजन सेवेचा प्रारंभ

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

दापोली शहरात श्री समर्थ कृपा बचत गटाच्या माध्यमातून शिवभोजन सेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे गरीब कुटुंबातील लोकांचे अतोनात हाल होत आहेत. काही कुटुंबांना रोजच्या जेवणाची भ्रांत पडलेली आहे. यामुळे प्रत्येक तालुक्यात शिवभोजन सेवेचा शुभारंभ करण्याचे सुतोवाच नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर दापोलीत डॉ. काणे यांच्या एक्स-रे क्लिनिकच्या बाजूला मुरकर यांच्या निवासस्थानी या शिवभोजन सेवेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
दापोलीत ही सेवा दुपारी 12 ते 2 या वेळेत सुरू राहणार आहे. या सेवेचा शुभारंभ नगराध्यक्षा परविन शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शिवसेनेचे नेते सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, पंकज सुर्वे यांच्यासह महिला आघाडी अध्यक्षा सौ. मानसी विचारे, माजी नगराध्यक्षा उल्का जाधव, नगरसेवक व बचत गटाच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या.

Related Stories

खोची- दुधगाव बंधारा पाण्याखाली; वारणेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर

Abhijeet Khandekar

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यात 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 1950 अर्ज वैद्य 14 अवैद्य

Abhijeet Shinde

Kolhapur; ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये कोल्हापूरच्या शशांक चोथे यांचा सहभाग

Abhijeet Khandekar

सरवडेची स्मशानभूमी धगधगतीच

Abhijeet Shinde

कराडजवळ भीषण अपघात; गावडे कुटुंबावर काळाचा घाला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!