Tarun Bharat

दापोली : कोरोना पश्यात पुन्हा भरली कर्णबधिर शाळा

Advertisements

दापोली प्रतिनिधी

दापोली शहरातील स्नेहदीप दापोली या संस्थेची कर्णबधिर शाळा कोरोना पश्चात प्रथमच मुलांनी गजबजली. कोरोना काळात ही शाळा बंद ठेवण्यात आली होती. शासनाने आदेश दिला नुसार 2 मार्च पासून ही शाळा पूर्व सुरू झाली आहे. आज 2 मार्च रोजी शाळेत दाखल झालेल्या मुलांचे संस्था संचालक व शिक्षक यांनी फुलांचा वर्षाव करून व आरती करून स्वागत केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना फेटे देखील बांधण्यात आले होते. यावेळी नगरपंचायतीने विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य दिलेल्या खेळण्यांच्या साहित्यांचे देखील कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नीलांबरी अधिकारी, शुभांगी गांधी, सुहासिनी कोपरकर, स्मिता सुर्वे, दिनेश जैन, मनोहर जैन, नंदकिशोर भागवत, संगीता तलाठी, यांच्यासह माधुरी मादुसकर, मनोहर जालगावकर, सूर्यकांत खेडेकर, संपदा बडबे, धोंडीबा राठोड, श्रद्धा गोविलकर, बंडू कौरे आदी शिक्षक व कला शिक्षक उपस्थित होते.

Related Stories

आचऱयात सापडला चक्क पाण्यावर तरंगणारा दगड

NIKHIL_N

दीक्षित गेडाम सर्वाधिक कार्यकाळाचे मानकरी

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोली पाजपंढरी बससेवा ७ महिन्यांनी पून्हा सुरु

Abhijeet Shinde

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 17,920 वर

Rohan_P

कर्नाटक : नोव्हेंबर अखेर संपूर्ण प्रौढ नागरिकांचे लसीकरण करणार: आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

उत्तर कोरियाने बनवले लांब पल्ल्याचे ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्र

datta jadhav
error: Content is protected !!