Tarun Bharat

दापोली : गव्हे येथे तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / दापोली

चक्रीवादळात पडलेल्या पडवीचे काम करत असताना दापोली तालुक्यातील गव्हे, पवारवाडी येथील शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची रविवारी दुपारी घडली. गव्हे येथील सचिन लिंगावळे, वय 33 हा युवक घराच्या पडवीचे काम करत होता. त्याच्या घराच्या पडवीचे पावसाने नुकसान झाले होते. यामुळे भिंती देखील ओल्या झाल्या होत्या. पडवीत काम करत असताना विजेचा बोर्ड त्याने पुसायला घेतला असता त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. या विजेच्या धक्क्याने सचिन याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.
सचिन हा मनमिळावू व मोठा मित्रपरिवार असणारा युवक होता. त्याच्या अकस्मित निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकोन्स्टेबल संदीप गुजर करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा मोठा परिवार आहे.

Related Stories

राज्यपाल कोश्यारी सिंधुदुर्गात दाखल

Ganeshprasad Gogate

अनधिकृत दारूधंदे बंद करा!

NIKHIL_N

दोडामार्ग पोलिसांतर्फे नवरात्रोत्सवात खास उपक्रम

NIKHIL_N

वीज बिलात सहा महिन्यांपर्यंत 50 टक्के सवलत द्या!

NIKHIL_N

विजयदुर्ग खाडीत राज्यस्तरीय खुली जलतरण स्पर्धा

NIKHIL_N

आता कोणीही, कितीही विरोध केला तरी रिफायनरी होणार!

Patil_p
error: Content is protected !!